Home Loan Repo Rate: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी गुरूवारी (दि. 7 एप्रिल) पतधोरण समितीची बैठकीनंतर घेतलेल्या परिषदेत रेपो दर जैथे ठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरासाठी कर्ज घेतलेल्यांना थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळाल आहे. कारण गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने सातत्याने रेपो दरामध्ये वाढ केली. आरबीआयने एप्रिल 2022 पासून आतापर्यंत रेपो दरामध्ये जवळपास 250 बेसिस पॉईंटने वाढ केली.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक दर दोन महिन्यांनी होत असते. आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिली बैठक गुरूवारी पार पडली. या बैठकीत पतधोरण समितीने रेपो दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बॅंकांकडूनही होम लोनच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. कर्ज देणाऱ्या बॅंकांनी मागील वर्षात सातत्याने होम लोनच्या व्याजदरात वाढ केली आहे.ज्यांनी 7 किंवा 7.50 टक्के व्याजदराने कर्ज घेतले होते. त्यांचा सध्याचा दर हा 2.50 टक्क्यांनी वाढून 9.50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परिणामी कर्जदारांचा एकतर ईएमआय वाढला किंवा त्यांचा कर्जाचा कालावधी वाढला आहे. त्याचा यावेळी सुद्धा आरबीआयने रेपो दरात वाढ केली असती तर पुन्हा एकदा कर्जधारकांना भुर्दंड भरावा लागला असता.
सध्याची जागतिक पातळीवरील आर्थिक स्थिती पाहता अनेक देशांमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. भारतातही महागाई अपेक्षित बिंदूपेक्षा वरच्या स्तरावर आहे. पण तरीही इतर देशांच्या तुलनेत भारताची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे अर्थतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, यावेळी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून आरबीआय रेपो दरामध्ये वाढ करेल, अशी शक्यता होती. पण आरबीआयने रेपो दर जैसे थे ठेवून कर्जदारांना दिलासा दिला आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि इतर देशांची तुलना करता भारताने एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 250 बेसिस पॉईंटने रेपो दरात वाढ केली. तर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 450 बेसिस पॉईंट, हॉंगकॉंग 450 बेसिस पॉईंट, कॅनडा 400 बेसिस पॉईंट, इंग्लंड 350 बेसिस पॉईंट, युरोप 350 बेसिस पॉईंट आणि ऑस्ट्रेलियाच्या सेंट्रल बॅंकेने 350 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे.
आरबीआयने सध्या व्याजदरात वाढ केलेली नसली तरी येणाऱ्या काळात यामध्ये वाढ होऊ शकते. अशा सूचक इशारा गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिला आहे.