Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Literacy for Business: स्वत:चा व्यवसाय करायचाय मग 'हे' आर्थिक साक्षरतेचे नियम समजून घ्या!

Rules of financial literacy for business

Image Source : www.emeritus.org

Rules of Financial Literacy for Business: आर्थिक साक्षरता किंवा व्यावहारिक ज्ञान हा यशस्वी व्यवसायाचा केंद्रबिंदू मानला जातो. व्यवसायातील आर्थिक स्थिती, त्यातील जोखीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेली संधी याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर बिझनेसमध्ये यश मिळू शकते. तर व्यवसायातील नेमकी आर्थिक साक्षरता म्हणजे काय? हे आपण समजून घेणार आहोत.

कोणत्या व्यवसायाचे यश हे त्यात घेतलेल्या मेहनतीत तर असतेच. पण त्याहीपेक्षा त्या व्यवसायासाठी आपण स्वत: तयार केलेल्या नियमांममध्ये त्याचा वाटा मोठा असतो. कारण आर्थिक साक्षरता किंवा व्यावहारिक ज्ञान हा यशस्वी व्यवसायाचा केंद्रबिंदू मानला जातो. व्यवसायामध्ये भांडवल, नफा आणि तोट्याचा मेळ, आर्थिक स्थिरता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आर्थिक निर्णय हे खूप महत्त्वाचे ठरतात. 

Financial Management योग्य असेल तर व्यवसायामध्ये स्थिरता येते आणि त्यात वाढही होत राहते. व्यवसायातील सध्याची आर्थिक स्थिती, त्यातील जोखीम आणि मार्केटमध्ये उपलब्ध असलेली संधी याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर बिझनेसमध्ये यश मिळू शकते. या गोष्टींची पूर्णपण कल्पना असलेला व्यावसायिक मार्केटमधील बदलानुसार आपल्या प्लॅनिंगमध्ये त्यानुसार बदल करू शकतो आणि आलेल्या परिस्थितील तोंड देत त्यातून अपेक्षित नफा मिळवू शकतो. पण व्यवसायातील फायनान्सची बेसिक माहिती नसेल तर अशावेळी गोंधळ उडतो आणि त्यातून मोठे नुकसान होते. उदाहरण म्हणून तुम्ही कोणताही लहानातला लहान उद्योग निवडा आणि त्यासाठी कोणत्या आर्थिक गोष्टी गरजेच्या आहेत, त्या मांडायचा प्रयत्न करा.

व्यवसाय सुरू करताना कोणत्या आर्थिक गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे?

आर्थिक साक्षरता ही आता मूलभूत आणि काळाची गरज बनली आहे. कारण पैशांच्या देवाण-घेवाणीपासून त्याचा वापर, त्याचे नियम, टेक्नॉलॉजी अशा कितीतरी गोष्टींमध्ये बदल होत आहेत. त्याची योग्य माहिती नसेल तुम्ही या क्षेत्रात मागे पडू शकता किंवा यातून तुमची फसवणूकही केली जाऊ शकते. त्यामुळे आर्थिक साक्षरता का गरजेचे आहे आणि व्यवसाय सुरू करायचा असेल नेमक्या कोणत्या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे, हे आपण पाहणार आहोत.

मालमत्तेची विभागणी करून त्यानुसार खर्च करावा

कोणत्याही कंपनीत किंवा व्यवसायात गुंतवलेले पैसे हे वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता आणि दायित्वांमध्ये विभागलेले असतात. मालमत्तेमध्ये अशा सर्व गोष्टींचा समावेश होतो, ज्या व्यवसायातून आपल्याला उत्पन्न मिळते आणि ते तयार करण्यासाठी जो आपण खर्च करतो. त्याचा समावेश मालमत्तेत होतो. ही मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली जाते. ती म्हणजे Current आणि Non-Current. करंट अॅसेटमध्ये वर्षभरासाठी आपण ज्या गोष्टी वापरल्या जातात. त्याचा समावेश होतो. तर नॉन-करंट अॅसेटमध्ये ज्या गोष्टी वर्षानुवर्षे वापरल्या जातात. जसे की, मशीन, उत्पादन घेण्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळी अवजारे.

अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळा

या मालमत्तेवर व्यवसायाचे संपूर्ण भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे त्याची किंमत, उत्पादन क्षमता, दर्जा याची माहिती असणे गरजेचे आहे. कारण या गोष्टींच्या मदतीनेच उत्पादन घेतले जाते आणि व्यवसाय केला जातो. या व्यतिरिक्त व्यवसाय करताना काही बेसिक नियम पाळणे गरजेचे आहेत. जसे की, तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या बिझनेससाठी सुरूवातील महागड्या वस्तू खरेदी करू नका. उदाहरणार्थ, महागडे कॉम्प्युटर्स, कमर्शिअल बिल्डिंगमध्ये ऑफिस किंवा तिथले फर्निचर या गोष्टी फक्त कामापुरत्या वापराव्यात.

जमा-खर्च स्वत: पाहा

व्यवसाय किंवा ऑफिसच्या सेटअपवर भरमसाठ पैसे खर्च करण्याऐवजी आपल्या व्यवसायाची जाहिरात, प्रोडक्टचे मार्केटिंग यावर मार्केटनुसार पैसे खर्च करणे आवश्यक आहेत. कारण यातून व्यवसाय वाढणार आहे. या खर्चाबरोबरच बिझनेसमधील रेकॉर्ड आणि अकाउंटिंग हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. पण म्हणून यासाठी सीएची नेमणूक करून आपण त्यातून लक्ष काढून घेऊ नये. सुरूवातीला आपल्या व्यवसायातील बारीक-सारीक जमा-खर्चावर स्वत: लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यातून बचत आणि खर्चाची आवश्यकता ठरवण्यास मदत होऊ शकते.

आर्थिक साक्षरता ही ढोबळ अर्थाने तुम्हाला खूपच बेसिक टर्म वाटेल. पण यातून जी आर्थिक शिस्त लागते. ती खूप महत्त्वाची असते आणि व्यवसाय करणाऱ्यांनी हिशोबात चोख असणे खूप गरजेचे आहे. तर तुम्हीही स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या व्यवसायाला फायद्यात आणणारी आणि एकूणच तुम्हाला चांगल्या आर्थिक सवयी लावणारी आर्थिक साक्षरता समजून घ्या.