Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sachet RBI Portal : झटपट लोन घेऊन अडचणी वाढल्या असतील तर RBI च्या ॲपचा घ्या आधार…

RBI

या पोर्टलवर जाऊन ज्या कर्जदारांना मानसिक त्रास दिला जातो आहे, असे कर्जदार त्यांची तक्रार थेट आरबीआयकडे नोंदवू शकणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यांवर आणि वेबसाईटवर टाकलेली आहे.

सध्या इन्स्टंट लोन देणाऱ्या ॲपचा सुळसुळाट आहे. सध्या मार्केटमध्ये असे काही ॲप उपलब्ध आहेत जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 मिनिटात लाखो रुपयांचे लोन देण्यास तत्पर आहेत. अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडून अनेक भारतीयांनी कर्ज घेतले आहे. मात्र वेळेत परतफेड न करता आल्यामुळे लोन देणाऱ्या कंपन्यांनी वेगवगेळ्या प्रकारे कर्जदार ग्राहकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षात कंपन्यांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या होत्या.

या सर्व प्रकरणांची आता रिझर्व बँक ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतलेली पाहायला मिळते आहे. काही महिन्यांपूर्वी झटपट लोन देणाऱ्या काही ॲप्सवर केंद्र सरकारने बंदी देखील आणली होती.

परंतु ग्राहकांना अशाप्रकारे त्रास देण्यास आरबीआय कायम विरोध करत आली आहे. खरे तर दोन वर्षांपूर्वीच RBI ने 'Sachet' नावाने एक पोर्टल सुरु केले आहे.

काय आहे हे पोर्टल?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने कर्ज देणाऱ्या खासगी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या तक्रारी RBI कडे थेट पोहोचाव्यात यासाठी  'Sachet' नावाने एक पोर्टल सुरु केले आहे.

या पोर्टलवर जाऊन ज्या कर्जदारांना मानसिक त्रास दिला जातो आहे, असे कर्जदार त्यांची तक्रार थेट आरबीआयकडे नोंदवू शकणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यांवर आणि वेबसाईटवर टाकलेली आहे.

नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) जाऊन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपवर ग्राहकांना त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागणार आहे. एकदा की ॲपवर नोंदणी केली की ‘File a Complaint’ या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकणार आहात.

कशी होईल कारवाई?

ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेल आयडीवर एक संदेश येईल. त्यांनतर रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल तक्रारदारांना कळवण्यात येते.