Railway Ticket: आजही अनेक लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. उत्तम सुविधा आणि रास्त तिकिटांची किंमत यामुळे अनेक भारतीय मोठ्या आनंदाने लांबच्या प्रवासासाठी रेल्वेची निवड करतात. पण अनेकदा धावपळीत किंवा थोडी गडबड झाली की रेल्वे हाताची सुटते. अर्थात हे कोणी मु्द्दाम करत नाही. तिकीट(Railway Ticket) असताना रेल्वे हातची सुटली तर खूप जास्त चिडचिड होते. अशावेळी एक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात येतो की, ही रेल्वे तर सूटली पण याच तिकिटावर दुसऱ्या रेल्वेने पुन्हा प्रवास करता येतो का? की पुन्हा खिशाला भूर्दंड बसतो? तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
नियम काय सांगतो?(What does the rule say?)
असा प्रसंग बऱ्याच जणांच्या बाबतीत घडलेला असतो. तर यांचे उत्तर तुमच्या तिकीटाच्या श्रेणीवर अवलंबून असते. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार(Indian Railway rules), जर तुम्ही तिकीट आरक्षित(Reserved Ticket) केले असेल आणि रेल्वे सूटली तर त्याच तिकिटावर दुसऱ्या रेल्वेने प्रवास करता येत नाही. रेल्वेच्या नियमानुसार, तुमची सीट ही आरक्षित ठेवण्यात येते. त्यामुळे त्याच ट्रेनमधून तुम्हाला प्रवास करता येतो. पण ही रेल्वे हातची सूटली तर दुसऱ्या रेल्वेने तुम्ही त्याच तिकिटावर प्रवास करू शकत नाही. परंतु तुमच्याकडे रेल्वेचे जनरल तिकीट(General Ticket) असेल तर त्या तिकीटावर दुसऱ्या रेल्वेनेही तुम्हाला प्रवास करता येतो. याचे कारण असे की, तुमच्याकडे सर्वसाधारण श्रेणीचे तिकीट असते आणि हे तिकीट सर्वच रेल्वेत ग्राह्य धरले जाते. आरक्षित तिकीटासाठी मात्र हा नियम लागू नाही. रेल्वे सूटल्यावर तुम्हाला नवीन तिकीट खरेदी करूनच पुढील प्रवास करावा लागतो.
रिफंड मिळतो पण...(Refunds are available but...)
erail.in या रेल्वेच्या वेबसाईटनुसार, तुम्ही ज्या रेल्वेने प्रवास करण्यासाठी जागा आरक्षित केली असेल आणि ती हातची सूटली तर तुम्हाला तिकीटाची रक्कम परत मागता येते. रिफंड(Refund) मागण्यासाठी तुम्हाला रेल्वेकडे तसा दावा करावा लागतो. रेल्वेच्या तिकीटाच्या नियमानुसार प्रवाशाला रक्कम परत करण्यात येते.
जर तुम्हाला रिफंड हवा असेल, तर त्यासाठी तिकीट रद्द(Ticket Cancelled) करण्याची गरज नाही. त्यासाठी टीडीआर(TDR) फाईल करावा लागतो. निर्धारीत वेळेत तुम्ही निश्चित रेल्वे प्रवास का करु शकला नाही, याचे सविस्तर कारण तुम्हाला सांगावे लागते. रेल्वे का मिस झाली याची माहिती देखील तुम्हाला रेल्वेला द्यावी लागते. याशिवाय रेल्वेचा चार्ट तयार करण्यापूर्वीच तुम्ही तिकीट रद्द केले तर रक्कम परत मिळविण्यासाठी दावा करता येतो. पण रेल्वेचा चार्ट तयार झाल्यावर तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला रक्कम रिफंड(Refund) मिळत नाही. तसेच टीडीआर(TDR) ही तात्काळ फाईल करावा लागतो तरच त्याचा फायदा होतो. एका तासानंतर तुम्ही टीडीआर(TDR) फाईल केलात तर रिफंड मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते.