Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Whatsapp New Feature: व्हॉट्सॲपवरील मॅसेज चुकून डिलिट झाला, तर तो पुन्हा मिळविणे शक्य

Whatsapp New Feature

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपवर सातत्याने नवीन फीचर पाहायला मिळत असतात. आता व्हॉट्सॲपवर आणखी एक नवीन फीचर आले आहे. या फीचरचा उपयोग म्हणजे तुमच्याकडून एखादा डिलिट झालेला मॅसेज, तुम्ही पुन्हा मिळवू शकता. असे हे युनिक फीचर कोणते आहे, याबाबत थोडक्यात जाणून घेवुयात.

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपवर नेहमी असे होते की, एखादया ग्रुपवर आपण एक मॅसेज टाकतो, पण तो चुकीचा गेला, हे जसे लक्षात येते, तो मॅसेज आपण घाईघाईने डिलिट करतो. पण आपल्याकडून एक चूक होते. ती म्हणजे आपण ‘डिलिट फाॅर एव्हरीवन’ करण्याएवजी ‘डिलिट फाॅर मी’ करतो. त्यामुळे मोठी पंचाईत होते. हे झाल्यावर करायचे काय, हा प्रश्न पडतो. यावरच उपाय म्हणून व्हॉट्सॲपने नवीन फीचर आणले आहे. याबाबत सविस्तर जाणुन घेऊयात.

हे फीचर कोणत्या मोबाईलमध्ये(This Feature in which Mobile)

व्हॉट्सॲपवरचे हे फीचर ios व Android या दोन्हींसाठी वापरता येणार आहे. ‘डिलिट फाॅर मी’ या पर्यायासाठी देण्यात आला आहे. समजा, तुमच्याकडून एखादा मॅसेज चुकून ‘डिलिट फाॅर मी’ झाला असेल तर तो मॅसेज पूर्ववत करण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेकंदाचा वेळ असणार आहे. तुम्ही फक्त पाच सेकंदात तो मॅसेज पूर्ववत करून, तो ‘डिलिट फाॅर एव्हरीवन’ करू शकता. त्यामुळे आता तुम्ही ‘डिलिट फाॅर मी’ या समस्येत अडकणार नाही. 

डिलिट फाॅर एव्हरीवन (Delete for Everyone)

‘डिलिट फाॅर एव्हरीवन’ची सुविधा 2017 मध्ये व्हॉट्सॲपने आणली होती. युजर्सने चुकून पाठविलेले मॅसेज डिलिट करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली होती. अगदी सुरूवातीला पहिल्या सात मिनिटांमध्येच चुकून गेलेला मॅसेज डिलिट करू शकत होतो. आता मात्र ही वेळ साठ तास इतकी करण्यात आली आहे.

डिलिट फाॅर मी ची समस्या संपणार (Delete for me will Solve the Problem)

मित्रांचो ग्रुप असो या आॅफीस ग्रुप या ग्रुपमध्ये सातत्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे, व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेला मॅसेज डिलिट करताना, तो घाईघाईत ‘डिलिट फाॅर मी’ होतो. मग डोक्याला हात लावण्यापलीकडे आपल्याकडे काहीच राहत नव्हते. कारण तो मॅसेज आपल्या चॅटमधून डिलिट झालेला दिसतो. पण तो प्रत्यक्षात ग्रुपमधून डिलिट झालेला नसतो. मात्र आता ही समस्या होणार कायमची दूर. आॅफिस ग्रुपवर चुकून गेलेला मॅसेज घाईघाईत डिलिट करताना ‘डिलिट फाॅर मी’ झाला असेल तरी, तो आता पुन्हा ‘डिलिट फाॅर एव्हरीवन’ करण्यासाठीचा पर्याय व्हॉट्सॲपने उपलब्ध करून दिला आहे. पण लक्षात ठेवा हा मॅसेज पूर्ववत आणून, तो पुन्हा ‘डिलिट फाॅर एव्हरीवन’ करण्यासाठी आपल्याकडे फक्च पाच सेकंदाचा वेळ असणार आहे.