It will be a Crime if the House is not Built under the Gharkul Yojana: जर शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत आलेला पैशांचा योग्य वापर केला नाही, तर त्या व्यक्तींवर गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. असेच काहीसे प्रकरण घरकुल योजनेबाबत घडले आहे. यासाठी सोलापूर जिल्हयातील लाभार्थ्यीवर गुन्हादेखील नोंदविण्यात आला आहे. याबाबत शासकीय नियम काय सांगतात, ते पाहुयात.
कोणावर नोंदविण्यात आला गुन्हा? (Who has been Charged)
सोलापूर जिल्हयातील लोकांसाठी घरकूल योजना अवलंबविण्यात आली होती. या जिल्हयामधील अनेक लोकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता. त्यापैकी 6,952 लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेऊनदेखील त्यांनी योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांनी घर बांधले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्ती आता अडचणीत सापडले आहेत. नियमांनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर या लोकांनी लोकअदालीतत पैसे न भरल्यास त्या लोकांवर शासकीय पैशांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
काय आहे नियम? (What is the Rule)
ज्या लोकांनी घरकुल योजनेसाठी अनुदान घेतले आहे. त्या लोकांनी या अनुदानाच्या पैशांतून घर बांधणे आवश्यक आहे. नियमांनुसार त्या व्यक्तींनी 90 ते 100 दिवसात घराचे बांधकाम करणे पूर्णपूणे बंधनकारक आहे. जर त्यांनी या अनुदानच्या पैशातून घर न बांधता त्या पैशांचा गैरवापर केला तर त्या व्यक्तींवर शासकीय नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.