सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या सर्व पर्यायांमध्ये सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून बँकेतील मुदत ठेवीकडे (Bank FD) पाहिले जाते. बँका निश्चित कालावधीसाठी विशेष मुदत ठेव योजना लॉन्च करतात. देशातील आयडीबीआय बँकेने निश्चित कालावधीसाठी विशेष मुदत ठेव योजना लॉन्च केली आहे. या योजनेचे नाव 'अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजना'(Amrit Mahotsav Special FD Scheme) असे आहे. या योजनेत गुंतवणूक करून गुंतवणूकदार सर्वाधिक व्याजदर आणि परतावा मिळवू शकतात. तुम्हालाही आयडीबीआय बँकेच्या विशेष मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर त्याचा गुंतवणूक कालावधी, त्यावर मिळणारा व्याजदर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजनेबद्दल जाणून घ्या
देशातील आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्वाधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Bank FD) 14 जुलै 2023 पासून सुरू केली आहे. या योजनेचे नाव 'अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजना' (Amrit Mahotsav Special FD Scheme) असे आहे. या योजनेचा कालावधी 375 दिवसांचा आहे.
या विशेष मुदत ठेव योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याजदर दिला जात आहे. म्हणजेच यातील गुंतवणुकीवर ज्येष्ठांना 7.60% व्याजदर मिळणार आहे. आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार अमृत महोत्सव विशेष मुदत ठेव योजनेत 15 ऑगस्ट 2023 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.
444 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना
आयडीबीआय बँकेच्या विशेष मुदत ठेव योजनेमध्ये 375 दिवसांशिवाय 444 दिवसांची विशेष मुदत ठेव योजना देखील सुरू केली आहे. या योजनेचे नाव देखील 'अमृत महोत्सव मुदत ठेव योजना' आहे. ही योजना बँकेने 13 फेब्रुवारी 2023 रोजी लॉन्च केली होती. यामध्ये ग्राहकांना 7.65% ते 7.75% व्याजदर मिळणार आहे. तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल आणि सर्वाधिक व्याजदरासह परतावा मिळवायचा असेल तर हा पर्याय देखील उत्तम आहे.
आयडीबीआय मुदत ठेव योजनेतील व्याजदर जाणून घ्या
आयडीबीआय बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देत आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा कार्यकाळ 7 दिवसापासून ते 5 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीसाठी बँक ग्राहकांना 3% ते 6.5% व्याजदर देत आहे. हे व्याजदर 14 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. तसेच 5 ते 10 वर्षाच्या कालावधीत करण्यात आलेल्या मुदत ठेव योजनेतील गुंतवणुकीवर बँक ग्राहकांना 6.25% ते 6.50% व्याजदर देत आहे.
Source: hindi.moneycontrol.com