खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. यात भारतात उच्च शिक्षणासाठी 1 कोटीं रुपयांपर्यंत तर परदेशात 2 कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते. (ICICI Bank Education Loan)
अंडरग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणारे शैक्षणिक कर्ज सर्वसाधारणपणे 8 ते 10 वर्ष कालावधीसाठी आहे. त्यात कर्जफेडीसाठी 6 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो. पदव्युत्त अभ्यासक्रमांसाठी कर्ज घेतल्यास बँकेडून 10 ते 12 वर्षांसाठी कर्ज दिले जाते. यात विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.
बँकेकडून 1 कोटींचे शैक्षणिक कर्ज विनातारण दिले जाते. काही निवडक संस्थांसाठी 40 लाखांपर्यंत विना तारण कर्ज मंजूर केले जाते. त्याशिवाय 20 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मार्जिन मनीची आवश्यकता नाही. 20 लाखांवरील कर्ज रक्कम असल्यास त्यावर 5 ते 15% मार्जिन मनी असते. कर्ज मंजूर करताना परकीय चलन विनिमय दराचा विचार केला जातो.
शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक मंजुर करताना परत फेडीसाठी किती कालावधी असावा याबाबत कर्जदाराला त्याचा पर्याय सांगून ठरवता येते.
शैक्षणिक कर्जामध्ये कोणत्या प्रकारच्या खर्चाचा समावेश
बँकेकडून मंजूर होणाऱ्या शैक्षणिक कर्जात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे शुल्क, परीक्षा शुल्क, लॅबरोटरी, लायब्ररी फी, आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्च, हॉस्टेल फी युनिफॉर्म आणि इतर शैक्षणिक साहित्यांचा समावेश, बिल्डींग फंड, डिपॉझिट, कॉम्प्युटरचे शुल्क यांचा समावेश असतो. याशिवाय कोर्स दरम्यान प्रोजक्ट असल्यास त्यासाठीचा खर्च देखील शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यास पात्र असतो.
बँकेचे शैक्षणिक कर्जासाठी विविध चार्जेस
आयसीआयसीआय बँकेकडून शैक्षणिक कर्जासाठी 2% प्रक्रिया शुल्क आकारले जाते. याशिवाय सिबिल चार्जेस म्हणून 100 रुपये, स्वाप चार्जेस 500 रुपये, डॉक्युमेंट्ससाठी 500 आणि चेक बाउंससाठी 500 रुपये शुल्क आणि जीएसटी शुल्क अतिरिक्त आकारले जाते.
कोणती कागदपत्रे आवश्यक
आयसीआयसीआय बँकेकडून एज्युकेशन लोन घेण्यासाठी पदवी प्रमाणपत्रे, 10 वी, 12 वीचे मार्कशीट, नव्याने जिथे प्रवेश घेतला आहे त्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजचे प्रवेशपत्र, एन्ट्रांस एक्झामचे सर्टिफिकेट, कोर्स शुल्क, केवायसी डॉक्युमेंट्स आणि अर्ज जर पालक करणार असतील तर त्यांचे ओळखपत्र आणि उत्पन्नाचे पुरावे सादर करावे लागतात.