Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai भारतात माइक्रो SUV-Exter आणि Creta लाँच करणार

Hyundai Launch Miocro SUV- Exter

Image Source : www.cardekho.com

Hyundai Launch Miocro SUV- Exter: कोरियन ऑटो कंपनी Hyundai भारतात नवनवीन गाड्या लाँच करण्यात रस घेत आहे. कोरियन ऑटो कंपनी Hyundai आता भारतात लवकरच एक SUV कार लाँच करणार आहे. Hyundai ने नुकतीच Verna sedan कार लाँच केली होती. Hyundai यापूढे लाँच करणार असणाऱ्या सर्व मॉडेल मध्ये ईवी आणि लेटेस्ट मॉडेल्सचे वर्जन असणार आहे.

Hyundai Launch Miocro SUV- Exter And Creta : कोरियन ऑटो कंपनी Hyundai 10 जुलै 2023 रोजी भारतात मायक्रो SUV- Exter लाँच करणार आहे. Grand i10 प्लॅटफॉर्मवर आधारित, नवीन Exter हे Hyundai ब्रँडचे दुसरे नवीन उत्पादन असेल,जे या वर्षी भारतीय बाजारात लॉन्च केले जाईल.कारण Hyundai ने नुकतीच Verna sedan कार लाँच केली होती. भारतीय बाजारातील ग्राहक आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक नवनवीन मॉडेल आणण्याच्या तयारीत आहे. Tata Panch ची विक्री कमी करण्यासाठी Hyundai Motor भारतीय बाजारपेठेत Exeter लाँच करणार आहे.

Hyundai च्या SUV- Exter मॉडेलची वैशिष्ट्ये

Hyundai  SUV- Exter मध्ये एच-आकाराच्या एलईडी डीआरएलसह वेन्यू प्रमाणे पॅरामेट्रिक ग्रिल मिळते. फ्लँक्ससह लोअर ग्रिल या गाडीला आकर्षक लुक देतात. यात नवीन डिझाइनचे 6 स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. 1.2L 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, ज्यात 83 PS पॉवर आणि 113.8 Nm जनरेट करते. सोबत 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.2L इंजिनसह CNG पॉवरट्रेन पर्याय असू शकतो. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटीचा पर्याय मिळू शकतो. या कारची एक्स-शोरूम किंमत 6 लाख ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

Hyundai Creta पण करणार लाँच

मायक्रो SUV- Exter नंतर भारतीय बाजारपेठेत Hyundai ब्रँडचे पुढील मोठे उत्पादन नवीन Hyundai Creta च्या रूपात लॉन्च केले जाणार आहे. Hyundai Creta गाडीची भारतीय रस्त्यांवर अनेक वेळा चाचणी करण्यात आली होती. क्रेटा फेसलिफ्ट आधीच इंडोनेशिया आणि ब्राझीलसह निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आहेत. तथापि, भारतीय मार्केटसाठी नवीन क्रेटा ग्लोबल ही इतर स्पेक मॉडेलपेक्षा वेगळी आहे. Hyundai Creta मॉडेलमध्ये भारतात काही विशिष्ट डिझाइन बदल आणि लेटेस्ट इंजिनचे पर्याय उपलब्ध होईल.

Hyundai Creta ची वैशिष्ट्ये

नवीन Hyundai Creta मध्ये ADAS तंत्रज्ञान दिले जाणार आहे. जे नवीन Verna मध्ये दिलेल्या ADAS तंत्रज्ञानासारखे असेल. ADAS  तंत्रज्ञानात  अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग,रियर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन, लेन कीप असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यांसारखी वैशिष्ट्ये असतील. विशेष म्हणजे, नवीन क्रेटा स्पोर्टियर एन लाइन मॉडेलमध्ये
देखील उपलब्ध करून दिली जाऊ शकते. नवीन Hyundai Creta मध्ये 360-डिग्री कॅमेरे आणि अपडेटेड कनेक्टेड कार टेक देखील ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

Hyundai Creta मध्ये नवीन 1.5-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे नवीन वेर्नामध्ये देखील येते. हे इंजिन 160bhp आणि 253Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे लेटेस्ट  1.5L NA पेट्रोल (115bhp) आणि 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन (115bhp) सह देखील सुरू राहू शकते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.