वाहन उद्योगासाठी हे वर्ष चांगलं जाण्याची शक्यता आहे. विविध कंपन्या आपले प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहेत. त्याला प्रतिसादही मिळत आहे. नियमित वाहनांसह इलेक्ट्रिक वाहनांनाही (Electric vehicles) मागणी वाढलीय. टाटा मोटर्सची प्रीमियम हॅचबॅक कार अल्ट्रोझ आय सीएनजी (Tata Altroz iCNG) अलिकडेच लाँच करण्यात आली. या कारची वाट बाजारपेठेत अनेक दिवसांपासून पाहिली जात होती. दुसरीकडे होंडाची एलिव्हेटदेखील (Honda Elevate) जून महिन्यात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाईनंही (Hyundai) आपलं नवं प्रॉडक्ट एक्सटर लॉन्च करण्याची पूर्ण तयारी केलीय. लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी कंपनी आपल्या या कारचे अपडेट्स सर्वांनाच देत आहे.
Table of contents [Show]
सोशल मीडियातून माहिती
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कंपनीनं ह्युंदाई एक्सटरच्या काही फीचर्सविषयी माहिती दिलीय. ह्युंदाई एक्सटरला लहान आकाराचे इलेक्ट्रिक सनरूफ मिळणार आहे. याशिवाय आणखी एक दमदार फीचर म्हणजे ड्युअल कॅमेरा असलेला डॅशकॅमदेखील ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याविषयी एक पोस्ट करण्यात आलीय. यामध्ये एक्सटरच्या 2 दमदार फीचर्सबद्दल सांगण्यात आलंय. पहिल्यांदा याला लहान आकाराचं इलेक्ट्रिक सनरूफ दिलं जाणार आहे. व्हॉइस कमांडवर ते चालणार आहे.
It’s time to soak in the sights of bright blue sky or starry nights. #HyundaiEXTER comes with a voice enabled Smart Electric Sunroof. Your voice is its command! #Thinkoutside. Think EXTER.
— Hyundai India (@HyundaiIndia) May 24, 2023
To know more: https://t.co/JgP6L0NrZQ#Hyundai #HyundaiIndia #ILoveHyundai pic.twitter.com/1a85vgIxCG
सेल्फीप्रेमींसाठी ड्युअल कॅमेरा डॅशकॅम
इलेक्ट्रिक सनरूफसह ड्युअल कॅमेरा डॅशकॅमही देण्यात आलाय. सेल्फीप्रेमींसाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. हा डॅशकॅम पुढच्या आणि मागच्या अशा दोन्हीसाठी काम करणार आहे. म्हणजेच पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही कॅमेऱ्यातून तुम्ही फोटो काढू शकता. या डॅशकॅममध्ये 2.31 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असणार आहे. स्मार्टफोनला अटॅच केल्यानंतर म्हणजेच कनेक्टिव्हिटीसह तो काम करणार आहे. डॅशकॅममध्ये मल्टिपल रेकॉर्डिंग मोडही देण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक सनरूफचं फीचर कंपनीनं पहिल्यांदाच एंट्री लेव्हल एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध करून दिलंय.
कारला आहेत 6 एअरबॅग्स
कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सबद्दल नेहमीच माहिती देत असते. 16 मेला कंपनीने या कारच्या फीचर्सची माहिती दिली होती. वर दिलेल्या दोन महत्त्वाच्या फीचर्ससह 6 एअरबॅग कारमध्ये उपलब्ध असतील. तर 40पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स देण्यात येत आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 6 एअरबॅग मिळवणारी ही भारतातली पहिली सब 4 मीटर एसयूव्ही आहे. कंपनीनं ड्रायव्हर, प्रवासी, पडदा आणि बाजूंसाठी एअरबॅग्ज दिल्या आहेत.
इतर दमदार फीचर्स
- ईएससी (Electronic Stability Control)
- व्हीएसएम (Vehicle Stability Management)
- एचएसी (Hill Assist Control)
- थ्री पॉइंट सीट बेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर (3-Point Seat Belt and seatbelt reminder)
- कीलेस एंट्री (Keyless Entry)
- ईबीडीसह एबीएस (ABS with EBD)
- रिअर पार्किंग सेन्सर्स (Rear Parking Sensors)
- ईएसएस आणि बर्गलर अलार्म (ESS & Burglar Alarm)
- हेडलॅम्प एस्कॉर्ट फंक्शन (Headlamp Escort function)
- ऑटो हेडलॅम्प (Auto Headlamps)
- आयएसओएफआयएक्स (ISOFIX)
- रिअर डिफॉगर आणि रिअर पार्किंग कॅमेरा (Rear Defogger & Rear Parking Camera)
- ड्युअल कॅमेरासह डॅशकॅम (Dashcam with dual camera)
- टीपीएमएस (हायलाइन) आणि बर्गलर अलार्म (TPMS ((Highline)) & Burglar Alarm)