Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kia EV6 SUV ला तोडीस तोड ठरतीये Hyundai ची 'ही' इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hyundai Ioniq 5 Price and Features

Image Source : www.hyundai.com

Hyundai Ioniq 5 Electric SUV: नुकतेच Hyundai कंपनीने 'Ioniq 5' ही दुसरी इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च केली. या कारची प्रतिस्पर्धी म्हणून Kia EV6 SUV या इलेक्ट्रिक कारला पाहिले जात आहे. देशात Hyundai Ioniq 5 लॉन्च झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यात कंपनीला 650 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. या निमित्ताने Hyundai Ioniq 5 या इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

सध्या देशातील वाढते इंधनाचे दर लक्षात घेता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.  भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) आघाडीवर आहे. नवनवीन फीचर्स आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लोकांची तिला पसंती मिळत आहे. टाटा सोबत महिंद्रा, एमजी, किया आणि Hyundai मोटर्स देखील प्रीमियम फीचर्स सोबत इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत आणत आहेत. 

नुकतीच Hyundai कंपनीने ‘Ioniq 5’ ही दुसरी इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च केली. या कारची प्रतिस्पर्धी म्हणून Kia EV6 SUV या इलेक्ट्रिक कारला पाहिले जात आहे. देशात Hyundai Ioniq 5 लॉन्च झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यात 650 हून अधिक बुकिंग करण्यात आले आहे. या निमित्ताने Hyundai Ioniq 5 या इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

फीचर्स जाणून घ्या

Hyundai Ioniq 5 ही कार केवळ 7.6 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेगाने धावते. ग्राहकांना या कारमध्ये एअरो-ऑप्टिमाइज्ड डिझाइनसह ग्रॅव्हिटी गोल्ड मॅट (Gravity Gold Matte), ऑप्टिक व्हाइट (Optic White) आणि मिडनाईट ब्लॅक पर्ल (Midnight Black Pearl) अशा तीन रंगांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ड्युअल 12.3-इंचाची स्क्रीन, ADAS लेव्हल 2, पॉवर सीट्स, सहा एअरबॅग्ज, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि व्हेइकल-टू-लोड फंक्शन (V2L) सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्यामुळे एकदा कार चार्ज केल्यावर 631 किमी एआरएआय (ARAI) ची रेंज देते. यामध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 217hp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 350kW DC चार्जरद्वारे 10% ते 80% पर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त 18 मिनिटांचा वेळ घेते. तसेच यात पिक्सेलेटेड डिझाईन असलेली हेडलाईट आणि टेल-लाईट देण्यात आली आहे.

Kia EV6 SUV च्या तुलनेत  Hyundai Ioniq 15 लाखाने स्वस्त

Hyundai Ioniq 5 ची प्रतिस्पर्धी म्हणून Kia EV6 कडे पाहिले जाते. 5 सीटर असलेली Kia EV6 एसयूवीची किंमत 60.95  ते 65.95 लाखाच्या दरम्यान आहे. ही कार 2 प्रकारात आणि 1 ट्रान्समिशन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. तर भारतात Hyundai Ioniq 5 ची शोरूम किंमत 45.95 लाख रुपये आहे. Kia EV6 SUV च्या तुलनेत  Hyundai Ioniq 5  जवळपास 15 लाखाने स्वस्त आहे.

Source: abplive.com