Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HSBC Group: भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रात एचएसबीसीची एंट्री; हाय नेटवर्थ ग्राहकांना पुरवणार सेवा

Banking

Image Source : www.telegraphindia.com

HSBC या युरोपातील बड्या बँकिंग ग्रुपने भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रात शिरकाव केला आहे. भारतातील फक्त श्रीमंत ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून भारतात व्यवसाय सुरू केला आहे. ग्लोबल प्राइव्हेट बँकिंग बिझनेसचा (GPB) शुभारंभ 4 जूनला केला. श्रीमंत व्यक्तींना गुंतवणूक आणि बँकिंग सेवा पुरवण्यात येईल.

HSBC Bank: HSBC या युरोपातील बड्या बँकिंग ग्रुपने भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रात शिरकाव केला आहे. भारतातील फक्त श्रीमंत ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून भारतात व्यवसाय सुरू केला आहे. ग्लोबल प्राइव्हेट बँकिंग बिझनेसचा (GPB) शुभारंभ मंगळवारी (4 जुलै) केला. हाय नेट वर्थ आणि अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्या भारतीय व्यक्तींना बँकिग सेवा पुरवण्यात येईल.

श्रीमंत भारतीयांसाठी खास बँक 

भारतीय उद्योजक आणि व्यवसायिक ज्यांची संपत्ती 2 मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे, फक्त अशा ग्राहकांसाठीच बँकिंग सेवा पुरवण्यात येईल. अती श्रीमंत व्यक्ती विविध ठिकाणी मोठी गुंतवणूक करत असतात. तसेच मालमत्ता खरेदी करतात. त्यांना बँकेकडून व्यवसायासाठी टार्गेट करण्यात येईल. इंग्लडमधील लंडन येथे बँकेचे मुख्यालय आहे. भारतीय म्युच्युअल फंड व्यवसायात एचएसबीसीने आधीच पाय रोवले आहे. आता खासगी बँकिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.  

वेल्थ मॅनेजमेंट, इन्वेस्टमेंट सोल्युशन आणि इतर बँकिंग सेवा पुरवण्यात येतील. भारतीय अर्थव्यवस्थेने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. त्यामुळे भारतातील व्यवसायाच्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. भारतीय अर्थव्यवस्था 2027-28 पर्यंत जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जगभरातील उद्योगांचे भारताकडे लक्ष लागले आहे. 

भारतातील अती श्रीमंतांचे वाढते प्रमाण

एचएसबीसी बँकेच्या अंदाजाप्रमाणे 30 मिलियन डॉलरपेक्षा जास्त रक्कम गुंतवण्याची क्षमता असलेल्या अती श्रीमंत भारतीय नागरिकांची संख्या 2027 पर्यंत 58 टक्क्यांनी वाढेल. लोकसंख्येच्या बाबतीतही भारताने चीनला मागे टाकले आहे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेकडे जगभरात आशादायक नजरेने पाहिले जात आहे. 

एचएसबीसीच्या या शाखेमध्ये 30 बँकर्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्याद्वारे अती श्रीमंत व्यक्तींना बँकिंग आणि गुंतवणूक सेवा पुरवली जाईल. अनेक देशांमध्ये एचएसबीसीने प्राइव्हेट बँकिंग व्यवसायाची सुरुवात केली आहे.