Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multi-Asset Investment: मल्टी अॅसेटमधील गुंतवणूक ठरू शकते गेम चेंजर; फक्त परतावा पाहून निर्णय घेऊ नका

Multi-Asset Investment

Image Source : www.corporatefinanceinstitute.com

गुंतवणूक करताना एकाच योजनेत सर्व पैसे ठेवू नका असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात. कारण, त्यामुळे जोखीम वाढते. समजा, तुम्ही सर्व पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवले आणि ती बँकच दिवाळखोरीत निघाली तर काय? तसेच शेअर मार्केटमध्ये सर्व पैसे गुंतवले आणि बाजार अचानक कोसळला आणि तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे, अशा वेळी काय कराल?

Multi-Asset Investment: गुंतवणूक करताना एकाच योजनेत सर्व पैसे ठेवू नका असा सल्ला आर्थिक सल्लागार देतात. कारण, त्यामुळे जोखीम वाढते. समजा, तुम्ही सर्व पैसे मुदत ठेव योजनेत गुंतवले आणि ती बँकच दिवाळखोरीत निघाली तर काय? तसेच शेअर मार्केटमध्ये सर्व पैसे गुंतवले आणि बाजार अचानक कोसळला आणि तुम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे, अशा वेळी काय कराल? 

तोट्यातील शेअर्स विकून नुकसान करून घ्याल का? नक्कीच नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना मल्टी अॅसेट पर्यायांमध्ये थोडी-थोडी रक्कम गुंतवावी. यातून जोखीमही विभागली जाते आणि प्रत्येक गुंतवणुकीच्या पर्यायाचा पुरेपूर फायदा घेता येतो. अर्थात अशी कोणतीही गुंतवणूक करताना अधिकृत आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यायला हवे. या लेखात पाहूया दीर्घकालीन गुंतवणूक करताना विविध ठिकाणी गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

म्हणजे पाहा ना, शेअर मार्केट अस्थिर झाल्यानंतर सोन्यातील, स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचा कल वाढतो. व्याजदर वाढल्यानंतर बाँडमधून मिळणारा परतावा कमी होतो. तर भांडवली बाजार तेजीत असताना सोन्याचे दर आकर्षक राहतीलच असे नाही. एकाच वेळी सगळे गुंतवणुकीचे ऑप्शन फायद्यात राहतील असे होत नाही. 

एकाची प्रगती तर दुसऱ्याची अधोगती होत असते. मात्र, हे झाले तात्पुरत्या काळासाठी. जेव्हा तुम्ही दहा-पंधरा-वीस वर्षांचा विचार करता तेव्हा सगळीकडे केलेली गुंतवणूक सारासार चांगला परतावा देते. त्यातून तुमचे गुंतवणुकीचे ध्येयही साध्य होईल. मात्र, जर तुम्ही फक्त इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि या फंडाने चांगली कामगिरी केली नाही तर पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

पोर्टफोलिओमधून चांगला परतावा मिळवण्यासाठीचे दोन महत्त्वाचे घटक म्हणजे तुम्ही जोखीम कशा पद्धतीने हाताळता आणि गुंतवणुकीतील वैविध्य किती प्रमाणात ठेवता. जोखीम कमी करण्यासाठी मल्टी अॅसेट इनव्हेस्टमेंट हा एक पर्याय आहे.

मल्टी अॅसेट इनव्हेस्टमेंट म्हणजे काय? (What is Multi-Asset Investment)

नावाप्रमाणेच एकाच योजनेत पैसे न गुंतवता अनेक ठिकाणी विभागून पैसे गुंतवणे. उदाहरणार्थ, इक्विटी, डेट, कमॉडिटी मार्केट, स्थावर मालमत्ता, गोल्ड, बाँड्स, मुदत ठेवी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बाजारातील चढउतारानुसार यातील एक गुंतवणूक फायद्यात तर दुसरी तोट्यात राहू शकते. दीर्घकाळात मात्र, फायदा होण्याची शक्यता वाढते.

फक्त परताव्याकडे पाहून केलेली गुंतवणूक? (Investment by just considering Returns)

बऱ्याच वेळा गुंतवणूकदार एखाद्या म्युच्युअल फंड योजनेचा फक्त परतावा पाहून गुंतवणूक करतात. तात्पुरत्या चांगला परताव्याकडे आकर्षित होतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. कारण, कोणतीही जास्त परतावा देणारी योजना कायम नफ्यातच राहील याची शाश्वती नाही आणि तोट्यातील फंड कायम तोट्यातच राहील, असेही नाही. दीर्घकाळात बदल नक्कीच होतात. बाजारातील अनुभवावरुन असे दिसते की मल्टी अॅसेटमध्ये गुंतवणूक करणारे दीर्घकाळात संपत्ती निर्माण करतात.

मल्टी अॅसेट म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक

या म्युच्युअल फंडद्वारे एकाचवेळी इक्विटी, डेट, गोल्डसह इतरही अनेक पर्यायात गुंतवणूक केली जाते. तसेच बाजारातील चढउतारानुसार प्रत्येक पर्यायातील गुंतवणूक कमी जास्त करता येते. सर्वसामान्यपणे मल्टी अॅसेट फंड 50-70% रक्कम इक्विटी मार्केटमध्ये गुंतवतात. 20-35% गुंतवणूक डेट आणि राहिलेले पैसे गोल्ड आणि इतर ठिकाणी गुंतवले जातात. 

इक्विटीमध्ये जोखीम असली तरी जास्त परतावा यातून मिळू शकतो.  तर डेटमुळे पोर्टफोलिओत स्थिरता साधली जाते. बाजारात पडझड होत असताना गोल्ड इटीएफ, REIT मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

मल्टी अॅसेट म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे फायदे काय? (Benefit of Multi-Asset Investment)

1) गुंतवणुकीत वैविध्य असल्याने जोखमी कमी होते. 
2) बाजारातील चढउतारानुसार गुंतवणुकीत बदल करता येतो. 
3) बाजारात अत्यंत टोकाचे चढउतार होत असतानाही जोखीम कमीतकमी राहते.