Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How To Use Bonus : बोनस स्मार्ट पद्धतीने कसा खर्च कराल, वाचा या पाच टिप्स

How To Use Bonus

Image Source : www.rediff.com

Use bonus smartly : एप्रिल महिना म्हणजेच नविन आर्थिक वर्ष सुरु होताच, आपल्याला नोकरीच्या ठिकाणी काही टक्के पगारवाढ आणि वार्षिक बोनस दिला जातो. आपण जर का या बोनसचा उपयोग योग्य प्रकारे केला तर, आपण आपल्या भविष्याची बरीचशी आर्थिक चिंता दूर करु शकतो. या बोनसच निधीचा वापर आपण आपले कौशल्य वाढविण्यासाठी, व्यावसाय स्थापन करण्यासाठी आणि सेवानिवृत्त झाल्यास गरजेच्यावेळी करु शकतो.

Use bonus smartly 5 Tips : प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. आज असे अनेक नोकरदार आहेत, ज्यांना सेवानिवृत्ती नंतर पेंशन मिळत नाही. मग तुम्हाला बोनस किंवा अतिरिक्त पगार स्वरुपात मिळत असलेल्या पैशांचा वापर आपण कसा करावा? आज आम्ही तुम्हाला काही उपाय सुचविणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदाने जगू शकाल.

क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत

तुम्ही आधी पासुन क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि नोकरी करीत असतांना तुम्ही त्याचे बिल अगदी वेळेत चुकते देखील केले असेल. मात्र सेवनिवृत्ती नंतर दर महिन्याला हातात पेमंट मिळत नसल्याने क्रेडिट कार्डचे बिल भरण्यास अडचण निर्माण होत असते. त्यामुळे साठवुन ठेवलेल्या बोनसच्या पैशांचा वापर तुम्ही गरज भासल्यास क्रेडीट कार्डचे बिल भरण्यास देखील करु शकता. वेळेत बिल भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहील.

आपत्कालीन निधी म्हणून वापर

प्रत्येक महिन्यात आपला अतिरिक्त होणारा खर्च टाळून, तुम्ही पैशांची बचत करु शकता. दर महिन्यात बचत केलेला पैसा आणि बोनसचा पैसा मिळून, तुमच्या बचतीच्या पैश्यांचा चांगला आकडा तयार होतो. हे पैसे तुम्हाला तुमच्या आपत्कालीन स्थितीत मदत करु शकतात. तसेच, जर का तुम्हाला तुमचे एखादी कर्ज तात्काळ फेडण्याची गरज भासल्यास, तुम्ही हे पैसे त्यावेळी उपयोगात आणू शकता. जमा झालेले बोनसचे पैसे जर का आपण एमरजंसी फँड मध्ये इन्व्हेस्ट केले. तर ते तुमच्या अत्यंत गरजेच्या काळात तुमच्या उपयोगात येईल. उदा. घरात सलग 4 ते 6 महिने कुणी आजारी राहील्यास, कुटूंबातील व्यक्तीचा अचानक अपघात झाल्यास.

परताव्याचा लाभ घेऊ शकता

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना न घेतलेल्या रजांचे पैसे, सेवानिवृत्ती ग्रॅच्युइटी आणि त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करीत असलेल्या रकमेचा समावेश होतो. ही सर्व रक्कम एकत्र केल्यावर एक मोठी रक्कम जमा होते. यासोबतच तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी बोनसचे पैसे साठवुन योग्य ती तरतूद करु शकता. ज्या कर्मचाऱ्यांना पेंशन मिळत नाही, त्या कर्मचाऱ्यांना अश्या प्रकारे बचत केलेल्या पैशांचा लाभ सेवानिवृत्तीनंतर होवू शकतो. तुम्ही सर्व प्रकारे बचत करुन जमा झालेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवल्यास मिळणाऱ्या व्याजाचा परतावा घेऊन, तुम्ही तुमचे आर्थिक जीवन सक्षम करण्यास घेऊ शकता. आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास , त्या पैशांवर चांगला परतावा मिळतो.

आरोग्यविमा आणि कौशल्य क्षमता वाढविण्यास

बचत केलेल्या बोनसच्या पैशांचा उपयोग तुम्ही स्वत:चा आरोग्य विमा काढण्यास करु शकता. तसेच काही कारणास्तव अचानक नोकरी सोडण्याची वेळ आल्यास या पैशांचा  उपयोग होऊ शकतो. नवीन चांगली नोकरी मिळविण्यास लागणाऱ्या स्वत: मधील कौशल्यांचा विकास करण्यासाठी, एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरु करण्यासाठी, ऑफिस आणि आयुष्य दोन्ही अपग्रेड करण्यासाठी देखील बचत केलेल्या बोनसच्या पैशांचा वापर होऊ शकतो.