Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका डिमॅट खात्यातून दुसर्‍या डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्स्फर कसे करायचे?

एका डिमॅट खात्यातून दुसर्‍या डिमॅट खात्यात शेअर्स ट्रान्स्फर कसे करायचे?

माहिती करून घेऊया ऑफलाइन आणि ऑनलाइन प्रोसेस.

शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. काही गुंतवणूकदार एकाहून अधिक डिमॅट खाते उघडतात. खरे पाहता खरेदी केलेले शेअर वेगवेगळ्या डिमॅट खात्यात ठेवण्याऐवजी एकाच ठिकाणी ठेवले तर त्यावर लक्ष ठेवणे सोयीचे जाते. आपल्या शेअरचे मूल्य तात्काळ समजण्यास हातभार लागतो. एखाद्या शेअरची किंमत किती वाढली किंवा किती परतावा दिला आहे, हे लवकर समजते. त्यामुळे आपल्याकडे अनेक डिमॅट खाती असतील तर आपण एका खात्यातून दुसर्‍या खात्यात शेअर ट्रान्सफर करु शकतो. हे काम ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही मार्गाने करता येते.

शेअर ट्रान्सफरची काय आहे प्रक्रिया?

ऑफलाइन (Offline) मार्ग: शेअर्स NSDL (National Securities Depository Limited) किंवा CDSL (Central Depository Services (India) Limited) मध्ये ठेवले असेल तर ऑफलाइनच्या मार्गाने एका डिमॅटमधून दुसर्‍या डिमॅट खात्यात ट्रान्सफर करता येतात. यासाठी आपल्याला डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरावी लागेल. ज्या खात्यात शेअर ट्रान्सफर करायचे आहे, त्या खात्याचे विवरण भरावे लागेल. अर्जात ट्रान्सफर करण्यात येणारे शेअरचा आयएसआयएन नंबर, कंपनीचे नाव, डिमॅट अकाउंट आणि त्या खात्याचा डीपी आयडीचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर आपल्याला ब्रोकिंग कंपनीच्या कार्यालयात अर्ज जमा करावा लागेल.
अर्जाची छाननी झाल्यानंतर आपले शेअर दुसर्‍या खात्यातून ट्रान्सफर केले जातील. यासाठी ब्रोकरेज हाऊस काही शुल्क आकारु शकतात. अर्थात आपले जुने डिमॅट खाते बंद करत असाल तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

ऑनलाइन (Online) मार्ग: शेअर्स CDSL च्या खात्यात असतील तर त्यास ऑनलाइन मार्गाने एका डिमॅट खात्यातून दुसर्‍या डिमॅट खात्यात ट्रान्सफर करता येऊ शकतात. यासाठी आपल्याला इझियस्ट प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल. https://web/cdsindia.com/myeasi/Home/Login या संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी लागेल. जुन्या डिमॅट खात्याची माहिती भरावी लागेल. त्यानंतर ज्या खात्यात शेअर स्थानांतरित करायचे आहेत, ते खाते जोडावे लागेल. चोवीस तासानंतर खाते जोडल्यानंतर जुन्या डिमॅट खात्यातून नवीन डिमॅट खात्यात शेअर ट्रान्सफर करु शकता.