बदलत्या जीवनशैलीनुसार दिवसेंदिवस आरोग्यविषयक समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. यावर उपाय किंवा संरक्षण म्हणून आयुर्विमा खरेदी करणे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. मात्र या इन्शुरन्सचा हप्ताही महाग झाला आहे. विमा धारकाला हृदयविकार, मधुमेह किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यासाठी जास्तीचा प्रीमियम भरावा लागतो. तसेच मद्यपान किंवा धूम्रपानासारख्या सवयी असल्यावरही जास्त प्रीमिअम द्यावा लागतो. तसेच जास्त वजनामुळे देखील तुमच्या प्रीमियमचा दर जास्त असतो. विमा कंपन्यांचे आरोग्या संदर्भातले नियम कडक असतात.
Table of contents [Show]
- अशी करा विमा बचत
- दीर्घकालीन आयुर्विमा खरेदी करा (Buy Term Insurance)
- अतिरिक्त शुल्क नसलेला विमा खरेदी करा (Buy Insurance With No Extra Charges)
- गॅरंटीड इन्कम प्लॅन घेण्यापूर्वी विचार करा(Think Before Purchasing a Guaranteed Income Plans)
- ऑनलाइन तपासा (Check Online)
- आयुर्विमा लवकर खरेदी करा (Buy Life Insurance In Early Age)
अशी करा विमा बचत
दीर्घकालीन आयुर्विमा खरेदी करा (Buy Term Insurance)
कमी मुदतीचा विमा खरेदी केल्यास वारंवार नुतनीकरण करावे लागते आणि दरवेळी या विम्याचा दर वाढत असतो. यामुळे नेहमी दीर्घकाळाची मुदत असलेला आयुर्विमा खरेदी करा. हा विमा खरेदी केल्यास विमाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला किंवा कुटुंबाला आर्थिक सहाय्य होते.
अतिरिक्त शुल्क नसलेला विमा खरेदी करा (Buy Insurance With No Extra Charges)
विमा खरेदी करण्यापूर्वी पॉलिसीसंदर्भातील अनेक छुपे शुल्क असतात ज्यात सुरुवातीला ग्राहकांना याबाबत माहिती नसते. एजंटकडून ही पॉलिसी घेतल्यास त्यात एजंटचे कमिशन शुल्क असते यामुळे पॉलिसीची एकूण किंमत वाढते.असे अनेक शुल्क पॉलिसीच्या किमतीत समाविष्ट असतात.
गॅरंटीड इन्कम प्लॅन घेण्यापूर्वी विचार करा(Think Before Purchasing a Guaranteed Income Plans)
लाइफ इन्शुरन्स म्हणजे विमा कंपनीने तुमची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असते, गॅरंटीड इश्यू पॉलिसीच्या बाबतीत, अशा कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते. विमा पॉलिसी अर्जदारासाठी ही पॉलिसी काढणे धोकादायक ठरते.
ऑनलाइन तपासा (Check Online)
बर्याच ऑनलाइन वेबसाइट विविध विमा पॉलिसी, देय प्रिमीयम इत्यादींची चांगली तुलना करतात. यामुळे तुम्हाला विमा पॉलिसीबाबत सर्व गोष्टींची माहिती मिळते. तुम्ही कमी किमतीतील योग्य विमा आयुर्विमा खरेदी करू शकता. शिवाय तुमच्या गरजांनुसार विविध कंपन्यांने लाईफ इन्शुरन्स प्लॅन्स एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्याने तुलना करणे सोपे जाते.
आयुर्विमा लवकर खरेदी करा (Buy Life Insurance In Early Age)
नेहमी तरुण व निरोगी असतांना विमा खरेदी करा. तुमचे वय जितके जास्त तितकी तुमची वैद्यकीय स्थिती विमा पॉलिसी काढण्यासाठी योग्य नसते. यामुळे तुमचा आयुर्विमा प्रिमीयम जास्त असतो. 30 वर्ष वयाच्या आत ही पॉलिसी खरेदी केल्यास तुम्ही पॉलिसी प्रिमीयमवर बचत करु शकतात.