Save Money with Enjoying Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टया एन्जॉय करताना पासपोर्ट आणि व्हिसाचा खर्च, विमान प्रवास, हॉटेलिंग, तसेच शॉपिंग हा खर्च कोणीही टाळू शकत नाही. मात्र हा सगळा खर्च करत असताना, तो वायफळ गोष्टींवर होणार नाही या खात्री करून जास्तीत जास्त पैशांची बचत कशी करता येईल, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. व्यवस्थित आणि योग्य नियोजन केले तर ट्रिपमधून नक्कीच पैशांच बचत करता येऊ शकते.
Table of contents [Show]
ठिकाण आणि ऑफिसच्या सुट्टया निश्चित करा
समर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही कुठे जाणार आहात, ते ठरवा. कारण तुम्ही ऑफिसमधून घेतलेल्या पेड लिव्ह आणि तुम्ही सहकुटुंब किती दिवसांसाठी प्रवासाला जात आहात. या दोन गोष्टींचा ताळमेळ साधणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास तुमच्या पेड लिव्ह संपताच अनपेड लिव्ह सुरु होतील. एक तुम्ही फिरण्यावर भरपूर पैसे खर्च केल्यानंतर आता पुन्हा अनपेड लिव्हमुळे खर्चात भर पडायला नको, म्हणून सुट्ट्यांचे योग्य नियोजन करा.
विमानाचे तिकिट आधीच बुक करा
आधीच कुठे जायचे हे ठरल्यास, त्यानुसार तुम्ही जर का विमानाचे तिकिट बुक केले. तर, वेळेवर महागडे तिकिट खरेदी करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. एक ते दोन महिन्याआधी बुक केलेले विमान प्रवासाचे भाडे आणि वेळेवर बुक केलेले विमान प्रवासाचे भाडे यामधल्या दरांमध्ये बरीच तफावत असते.
हॉटेल बुक करताना बचतीचा विचार करा
तुम्ही सुट्टयांमध्ये फिरायला कुठे जाता. यावर बरेच काही अवलंबून असते. जसे की, थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला तर या दोन्ही ठिकाणचे खर्च वेगवेगळे असू शकतात. थंड हवेच्या ठिकाणी गेला तर त्याला अनुरुप असे हॉटेलचे बुकिंग करावे लागेल आणि समुद्रकिनारी फिरायला गेला तर त्यानुसार बुकिंग करावे लागेल. या दोन्ही ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंगची कॉस्ट मात्र वेगवेगळी असेल. तेव्हा फिरायला जाण्याआधी हे सगळे ठरवा. त्याप्रमाणे ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला कुठे डिस्काउंट मिळत आहे का? ते किती दिवसांसाठी डिस्काउंट देत आहेत? याची माहिती घेऊन त्यानंतरच हॉटेलचे बुकिंग करा त्यामुळे तुमची बचत होईल.
रिवार्ड्स पॉईंट्स मिळवा
जर तुम्ही या आधी कोठे फिरायला गेलेला असाल आणि तिथल्या फेमस आणि चैन सिस्टिमधील एका हॉटेलमध्ये बुकिंग केले असेल, तर त्याचे रिवार्ड् पॉईंट्स तुमच्या खात्यावर जमा झालेले असतात. त्या रिवॉर्ड पॉईंटच्या बळावर तुम्ही दुसऱ्यांदा बुकिंग करताना त्यावर डिस्काऊंट मागू शकता किंवा रिवॉर्ड पॉईंटचा वापर करून बिलामध्ये सवलत मिळवू शकता.
ट्रॅव्हल्स एजन्सीच्या ऑफर तपासा
तुम्ही ऑनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सीच्या ऑफर देखील तपासू शकता. यामध्ये तुम्ही जर का पाच दिवसांकरीता हॉटेल बुक करीत असाल, तर त्यावर एक दिवस किंवा एक रात्र तुम्हाला मोफत राहण्याची ऑफर मिळू शकते. तसेच अनेक ट्रॅव्हल्स एजन्सी हॉटेल बुकिंगसह पिकअप आणि ड्रॉपिंगची सुविधा ही देतात. अशा ऑफर्समुळे तुमची बचत होऊ शकते.
क्रेडिट कार्डचा वापर करा
हॉटेल बुक करताना बऱ्याचवेळा क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून डिस्काऊंट ऑफर मिळत असतात. त्यामुळे बुकिंग करताना क्रेडिट कार्डचा वापर केला तर MakeMyTrip, ClearTrip, Booking.com, Goibibo यासारख्या बहुतांश ऑनलाईन ट्रॅव्हल कंपन्या बुकिंगवर भरपूर सूट देतात. तेव्हा अशा ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ मिळवून तुम्ही पैशांची बचत करु शकता.