Children's Education Money-Saving Tips: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई बरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील अतोनात वाढत चलला आहे. मुलांना सर्वोत्तम शिक्षण देणे हे पालकांचे एक ध्येय असते आणि या दिशेने सर्वच पालक कार्य करीत असतात. मात्र, महागाई बरोबरच शिक्षणाचा खर्च देखील सतत वाढत चालल्याने पालकांपुढे मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे आव्हानात्मक ठरत आहे. तेव्हा जाणून घेऊया महागाईचा सामना करीत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची बचत कशी करावी.
Table of contents [Show]
ध्येय निश्चित करा
मुलाच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करण्याबाबत योजना आखतांना, काही महत्वाच्या घटकांचा विचार करणे फार गरजेचे आहे. जसे की, तुमचा मुलगा भविष्यात कशा प्रकारचे शिक्षण घेणार आहे? त्यासाठी किती खर्च येणार आहे? तुमचा दैनंदिन व्यवहारातील खर्च किती? गरज पडल्यास तुम्हाला निधी उभारण्यासाठी किती वेळ लागणार? या सर्व बाबी लक्षात घेऊन एक निश्चित असे ध्येय ठरवणे गरजेचे आहे.
आजपासूनच गुंतवणुकीला सुरुवात करा
तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक करणे सुरु कराल, तेवढा जास्त फायदा तुम्हाला त्या गुंतवणुकीवर मिळेल. गुंतवणुकीची रक्कम कमी असो किंवा जास्त नियमितपणे गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत होते.
गुंतवणूक करण्यास योग्य मार्ग निवडा
तुमचे ध्येय पुढे ठेवून गुंतवणूक करतांना आपली इन्कम आणि गुंतवणुकीचे योग्य साधन विचारात घेणे गरजेचे असते. मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी गुंतवणुकीचा विचार करतांना चक्रवाढ व्याज देणारी आणि सुलभ तरलता प्रदान करणारी गुंतवणूक तुम्ही निवडायला हवी. यामुळे पुढील पाच, दहा किंवा पंधरा वर्षानंतर वाढत्या महागाईचा सामना करीत तुम्ही मुलांना योग्य शिक्षण देऊ शकाल.
ठरवलेले ध्येय परत परत तपासा
केवळ एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता विविध ठिकाणी गुंतवणूक करा. तुम्ही तुमच्या उद्दीष्ट पूर्तीच्या किती जवळ किंवा किती दूर आहात, हे वारंवार तपासून बघा. असे केल्यास तुम्हाला अगदी वेळेवर ताण येणार नाही. तुमचा मेहनतीचा पैसा आकस्मात आलेल्या आपत्तीवर एकावेळीच अपेक्षे पेक्षा जास्त खर्च होऊ नये, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जीवन आणि आरोग्य विमा काढा. हे दोन्ही विमा कवच अडचणीच्या काळात तुमचा अवास्तव पैसा खर्च होण्यापासुन वाचविण्यास मदत करेल. तुमचे ध्येय ठरवल्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने त्यावर वाटचाल करा.