Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to save income tax: इन्कम टॅक्स कसा वाचवू शकतो?

How to save income tax, Tax saving

How to save income tax: तुमचे वार्षिक इन्कम (Annual Income)2.50 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. जर इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) अंतर्गत टॅक्समध्ये समाविष्ट असता. जर तुमचे इन्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्यातील काही भागाची गुंतवणूक करू शकता.

How to save income tax: तुमचे वार्षिक इन्कम (Annual Income)  2.50 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स  भरावा लागणार नाही. जर इन्कम  2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स (Income tax) अंतर्गत टॅक्समध्ये समाविष्ट असता.  जर तुमचे इन्कम  2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्यातील  काही भाग गुंतवावा. ही गुंतवणूक (investment) केवळ तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करत नाही तर टॅक्स सुद्धा  कमी करते. इन्कम टॅक्स हा दोन शब्दांच्या संयोगाने बनलेला आहे “इन्कम” आणि “टॅक्स” म्हणजे हा उत्पन्नावर आकारला जाणारा  वार्षिक टॅक्स आहे. दरवर्षी करदात्याने वर्षभरात कमावलेल्या  उत्पन्नावर केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरांवर तो आकारला जातो. इन्कम टॅक्स  कायद्यानुसार टक्सेबल इन्कम  निश्चित केले जाते. इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत, अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करून तुम्ही दरवर्षी 1.50 लाख रुपयांपर्यंत टॅक्स  कमी करू शकता. ही एक वजावट आहे जी टक्सेबल इन्कममधून वजा केली जाते. काही अशा  योजनांमध्ये गुंतवणूक करूनही तुम्ही चांगला  परतावा मिळवू शकता. तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकता, त्या योजनांबाबत जाणून घेऊया. 

 सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund(PPF)

यामध्ये तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करू शकता. PPF वर सध्या वार्षिक 7.10% दराने व्याज मिळत आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कमही टॅक्समुक्त आहे. कोणतीही व्यक्ती, मग तो व्यवसाय करतो किंवा पगार घेतो, सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ खाते उघडू शकतो. या खात्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme(SCSS) 

ही योजना वृद्धांसाठी आहे. तुमचे वय 60  वर्षे असल्यास तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. त्यावर सध्या वार्षिक 7.4 % व्याज मिळत आहे. यामध्ये वर्षाला किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतील. या योजनेत गुंतवलेल्या रकमेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme(NPS) 

या योजनेत आतापासून गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत तर मिळतेच शिवाय गुंतवणुकीदरम्यान टॅक्समध्ये सूटही मिळते. इन्कम टॅक्सच्या कलम 80C व्यतिरिक्त, 80CCD (1B) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दावा केली जाऊ शकते. अशा प्रकारे, तुम्ही NPS मधील गुंतवणुकीवर टक्सेबल इन्कममधून  2 लाख रुपयांपर्यंतची वजावट घेऊ शकता.

 सुकन्या समृद्धी योजना  (Sukanya Samriddhi Yojana(SSY)

जर तुम्हाला 10 वर्षांपर्यंतची मुलगी असेल तर तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येईल. यामध्ये वर्षाला किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा करता येतील. त्यावर सध्या वार्षिक 7.6% व्याज मिळत आहे. मुलगी 21  वर्षांची झाल्यावर हे खाते परिपक्व होते. यामध्ये ही रक्कम फक्त 14 वर्षांसाठी जमा करावी लागेल.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (Equity Linked Saving Scheme(ELSS)

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची ही योजना आहे. त्याचा मुख्य उद्देश टॅक्स  वाचवण्याबरोबरच चांगला परतावा मिळणे हा आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम फंडमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन असतो. परताव्यावर दीर्घकालीन भांडवली नफा कर आकारला जात असला तरीही ही गुंतवणूक परताव्याच्या दृष्टीने चांगली आहे.

 मुदत ठेव (fixed deposit(FD) 

तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करूनही कर कमी करू शकता. तथापि, कर बचत एफडीमधील गुंतवणूक 5 वर्षांसाठी लॉक-इन आहे. यामध्ये व्याजदर वेळोवेळी बदलत राहतात आणि प्रत्येक बँक वेगवेगळे व्याजदर देते. सध्या, 5 वर्षांच्या FD वर वार्षिक 2% ते 7% व्याजदर आहे. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स सुद्धा द्यावा लागणार नाही आणि तुमच्या भविष्याची शिदोरी सुद्धा जमा होईल.