Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR: क्रिप्टोकरन्सी उत्पन्नाची माहिती कशी भराल?

ITR: क्रिप्टोकरन्सी उत्पन्नाची माहिती कशी भराल?

Image Source : www.vakilsearch.com

आटीआर फॉर्म (ITR) भरत असताना आता तुम्हाला नवीन नियमांनुसार व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सचा (VDA) म्हणजेच आभासी मालमत्तेचा देखील तपशील द्यावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार क्रिप्टो करन्सी मधून झालेल्या नफ्यावर आता कर भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर (ITR) फाइल करताना व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सची माहिती तपशील द्यावा लागणार आहे.

आयकर रिटर्न (ITR)फाईल करत असताना एका वर्षात मिळालेल्या उत्पन्नाची माहिती देणे अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्नाची माहिती देखील यामध्ये देणे गरजेचे आहे. क्रिप्टोकरन्सीचे उत्पन्न भारतात करपात्र मानले जाते आणि नवीन नियमांनुसार, क्रिप्टोकरन्सी उत्पन्नाचा अहवाल आयटीआर फॉर्म 2 मधील  Virtual Digital Asset(VDA) अंतर्गत करणे आवश्यक आहे. मात्र, बिटकॉइन्स आणि इथरियम यांसारख्या क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न ITR मध्ये कसे भरावे याबद्दल करदात्यांमध्ये संभ्रम आहे. ती माहिती कशा पद्धतीने भरावी याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

आटीआर फॉर्म भरत असताना आता तुम्हाला नवीन नियमांनुसार व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सचा (VDA) म्हणजेच आभासी मालमत्तेचा देखील तपशील द्यावा लागणार आहे. नवीन नियमांनुसार क्रिप्टो करन्सी मधून झालेल्या नफ्यावर आता कर भरावा लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आयटीआर (ITR) फाइल करताना  व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्सची माहिती तपशील द्यावा लागणार आहे.

ITR-2 किंवा ITR-3 भरावा लागेल

भारतीय आयकर विभागाच्या अनुसार, व्हर्चुअल डिजिटल अॅसेटच्या माध्यमातून कोणत्याही उत्पन्न कर पात्र मानले जाणार आहे. त्यामुळे जर आभासी मालमत्ता तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत असेल तर तुम्हाला त्याची माहिती 'शेड्युल व्हीडए' (VDA) अंतर्गत ITR-2 किंवा ITR-3 मध्ये भरावी लागेल.  करदात्यांना हे निश्चित करावे लागेल की Schedule VDA अंतर्गत उत्पन्न हे भांडवली नफा किंवा व्यावसायिक या पैकी कोणत्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. आयटीआर फाईल करत असताना तुम्हाला व्हर्चुअल डिजिटल अॅसेट्स खरेदी तारीख, हस्तातर दिनांक,  कर आकारणीसाठी उत्पन्नाची श्रेणी याची माहिती देणे गरजेच आहे.

किती आकारला जातो कर

"व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून निर्माण होणारे उत्पन्नावर  30 टक्के दराने कर आकारणी केली जाईल, तसेच यावर 4 टक्के सेस लागू असेल. यासह 50,000 रुपयांपेक्षा जास्त मुल्याच्या क्रिप्टो करन्सीच्या विक्रीवर 1% टीडीएस लागू होतो. क्रिप्टो टॅक्स त्या सर्व गुंतवणूक दारांना लागू  ज्यांची ती गुंतवणूक खासगी असो अथवा व्यावसायिक.

ITR भरण्याची शेवटची तारीख काय आहे?

आर्थिक वर्ष 2022-23 किंवा मूल्यांकन वर्ष 2023-24 (Financial Year & Assessment Year) साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2023 आहे. जे करदाते या तारखेच्या आत रिटर्न फाईल करणार नाहीत. त्यांना या तारखेनंतर 1 ते 5 हजार रुपये दंड भरून रिटर्न फाईल करावे लागेल.