Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नोकरीसाठी 'महास्वयंम' पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

नोकरीसाठी 'महास्वयंम' पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

महास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते आहे.

राज्यात असे बरेच लोक आहेत; जे सुशिक्षित असून सुद्धा नोकरीच्या शोधात आहेत. अशा बेरोजगारांच्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने महास्वयंम रोजगार नोंदणी पोर्टलची (Mahaswayam Rojgar Registration Portal) स्थापना केली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जात आहे. महास्वयंम रोजगार नोंदणी द्वारे (Mahaswayam Rojgar Registration) विविध संस्थांकडून नोकरी शोधणाऱ्यांना नोकऱ्या सहज उपलब्ध होणार आहेत. आधी महाराष्ट्र सरकारच्या महास्वयंम पोर्टलचे (Mahaswayam Portal) तीन भाग होते, प्रथम तरुणांसाठी रोजगार (Maharojgar), द्वितीय कौशल्य विकास (MSSDS) आणि तिसरा भाग म्हणजे स्वयंरोजगार (Mahaswayam Rojgar). या तीन भागांसाठी सरकारने वेगवेगळे पोर्टल्स सुरू केले होते, जे आता या महाराष्ट्र महास्वयंम रोजगार नोंदणी पोर्टल अंतर्गत जोडले गेले आहेत. राज्यातील जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना महास्वयंम रोजगाराच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

महास्वयंम रोजगार पोर्टलचे फायदे

  • नोकरीच्या शोधात असलेले राज्यातील तरुण या ऑनलाईन वेब पोर्टलवर नोंदणी करुन नोकरीच्या संधी मिळवू शकतात. 
  • प्रशिक्षण संस्था पोर्टलवर स्वत: ची नोंदणी करून संस्थेच्या जाहिरातीद्वारे प्रशिक्षण नोंदणी करून नोंदणी फी मिळवू शकतात.
  • या पोर्टलच्या माध्यमातून भारत सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण अभियानालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
  • राज्यातील कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, नोकरीची जागा आणि उद्योजकता विकासाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल.
  • पोर्टलवर नोंदणी करून नोकरीशी संबंधित माहिती, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याची माहिती मिळवू शकतात. 
  • या व्यतिरिक्त पोर्टलवर नोकरीसाठीही नोंदणी करू शकतात.

महास्वयंम रोजगार पोर्टलवरील नोंदणीसाठी कागदपत्रं

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्जदाराचे वय कमीत कमी 14 वर्ष पूर्ण असावे.
  • आधार कार्ड
  • गुणपत्रिका
  • स्किल सर्टिफिकेट (असल्यास)
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महास्वयंम रोजगारमध्ये नोंदणी कशी कराल

  • महास्वयंम रोजगाराच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
  • होम पेजवर तुम्हाला रोजगार हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. 
  • पुढील पेजवर नोंदणी पर्यायावर क्लिक करा. नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. 
  • सर्व माहिती भरल्यानंतर आणि कॅप्चा कोड भरल्यानंतर नेक्स्ट पर्यायावर क्लिक करा.
  • मोबाईलवर पाठविलेला ओटीपी भरा आणि “कन्फर्म” बटणावर क्लिक करा.
  • पुढील पेजवर वैयक्तिक तपशील, पात्रतेचा तपशील भरून ‘खाते तयार करा’ बटणावर क्लिक करा.
  • मग नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल-आयडीवर एसएमएस / ईमेल पाठविला जाईल.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा झाली तुमची नोंदणी पूर्ण.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर महास्वयंम रोजगार पोर्टलवर स्वतःची नोंदणी करून नोकरी मिळवू शकता.