• 26 Mar, 2023 15:38

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Premium payment: पेटीएमद्वारे एलआयसी प्रीमियम कसा भरावा? जाणून घ्या

LIC Premium

LIC Premium payment: आता तुम्ही फक्त तुमच्या UPI शी लिंक करून LIC पॉलिसीचे (LIC Policy Premium Payment by UPI App) घरी बसून पैसे देऊ शकता. पूर्वी तुम्ही फक्त नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकत होते, परंतु आता तुम्हाला UPI पेमेंटद्वारे देखील पेमेंट करता येऊ शकते.

LIC Premium payment: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे देशभरात करोडो पॉलिसीधारक आहेत. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. यासोबतच घरबसल्या ग्राहकांना विविध सेवांचा लाभ देण्यासाठी डिजिटलायझेशनवरही विशेष भर दिला जात आहे. जर तुम्ही बँकेत जाऊन LIC च्या पॉलिसीचा (LIC Premium Policy) प्रीमियम भरत असाल तर आता तुम्हाला तसे करण्याची गरज नाही.

आता तुम्ही फक्त तुमच्या UPI शी लिंक करून LIC पॉलिसीचे (LIC Policy Premium Payment by UPI App) घरी बसून पैसे देऊ शकता. पूर्वी तुम्ही फक्त नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकत होते, परंतु आता तुम्हाला UPI पेमेंटद्वारे देखील पेमेंट करण्याचा पर्याय मिळाला आहे. पेटीएम आणि फोनपे अॅप वापरून तुम्ही एलआयसी प्रीमियम कसा भरू शकता, ते माहित करून द्या. 

पेटीएमद्वारे LIC प्रीमियम भरा.. (Pay LIC Premium through Paytm..)

 • यासाठी प्रथम तुमचे पेटीएम अॅप उघडा.
 • येथे तुम्हाला LIC India चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला LIC पॉलिसी क्रमांक भरण्यास सांगितले जाईल. 
 • त्यानंतर उर्वरित डिटेल्स भरा.
 • यानंतर तुम्ही Proceed For Payment या पर्यायावर क्लिक करा.
 • यानंतर तुम्ही पेमेंटचा पर्याय निवडा.
 • पेमेंट केल्यानंतर, तुमचा LIC प्रीमियम जमा केला जाईल.
 • अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या LIC प्रीमियम भरू शकता.

असा भरू शकता फोन Pe द्वारे LIC प्रीमियम.. (You can pay LIC Premium through Phone Pe..)

 • LIC प्रीमियम भरण्यासाठी, सर्वप्रथम Phone Pe अॅप उघडा.
 • यानंतर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम पेमेंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
 • त्यानंतर LIC प्रीमियम पेमेंट पर्याय निवडा.
 • पुढे तुमचा LIC नंबर आणि ईमेल आयडी भरा आणि कन्फर्म वर क्लिक करा.
 • यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. ते निवडा.
 • तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिटेल्स भरा.
 • पुढे OTP येईल, तो भरा आणि सबमिट करा.
 • यानंतर तुमचा एलआयसी प्रीमियम जमा केला जाईल.