Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Salary Negotiation Tips: करिअर ब्रेकनंतर HR सोबत पगाराची वाटाघाटी कशी करावी? या टीप्स फॉलो करा

Salary Negotiate Tips

Image Source : www.knowledgecity.com

भारतीय जॉब मार्केटमध्ये करिअर ब्रेकला अनेक कंपन्यांकडून नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. जर तुम्ही नोकरीपासून काही काळ दूर असाल तर तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, योग्य नियोजन आणि तयारीने तुम्ही पगारवाढ मिळवू शकतात. नक्की कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवा हे आपण या लेखात पाहू.

Salary Negotiate Tips: करिअर ब्रेक हा अनेकांच्या प्रगतीमधला मोठा अडथळा ठरतो. कौटुंबिक अडचणी, उच्च शिक्षण, आजारपण किंवा इतरही अनेक कारणांमुळे जॉब सोडण्याची वेळ येते. मात्र, पुन्हा नोकरीसाठी अप्लाय करताना हा ब्रेक पगारवाढीतील अडथळा ठरतो. आधीच्या पगारापेक्षा कमी किंवा आहे त्याच पगारावर काम करायला लागू शकते.  

नक्की कोणत्या कारणासाठी तुम्ही नोकरीपासून दूर होता हे तुम्हाला पट‍वून सांगता आले नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते. तसेच मनापासून काम मिळणंही मुश्लिक होऊ शकतं. या लेखात पाहूया करिअर ब्रेक नंतर एचआरसोबत (How to Negotiate Salary with HR) पगाराबाबत वाटाघाटी कशी करावी.

भारतात करिअर ब्रेककडे एचआर कसे पाहतात?

भारतामध्ये करिअर ब्रेकला नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले जाते. तुम्ही अपडेटेड नाहीत, असाही एक अर्थ यातून काढला जातो. त्यामुळे अनेकजण करिअर ब्रेक लपवण्यासाठी मुलाखतीच्यावेळी खोटे बोलतात. मात्र, हे खोटे पकडले जाते. 

अशा वेळी तुमचे सिलेक्शन होण्याची शक्यता तर आणखीच कमी होते. त्यामुळे प्रामाणिकपणे उत्तरं देणं फायद्याचे ठरते. मात्र, फक्त खरे सांगून चालणार नाही. करिअर ब्रेकचा कसा सदुपयोग हे एचआरला पटवून देणं महत्त्वाचं ठरतं. 

जॉब ब्रेकनंतर जर तुम्ही मुलाखत देत असाल तर HR तुम्हाला आधीच्या कंपनीत जेवढा पगार मिळत होता तेवढाच ऑफर करण्याची जास्त शक्यता असते. तुम्हाला पगार वाढ देण्यास कंपन्या सहसा तयार होत नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत तुमची फसगत होता कामा नये. योग्य पद्धतीने एचआरसोबत वाटाघाटी केली तर जुन्या पगारावर वाढ मिळू शकते.

रेझ्युमेमध्ये काय बदल करावा? 

समजा तुम्ही, अडीच वर्षांचा करिअर ब्रेक घेऊन स्वत: चं स्टार्टअप सुरू केलं असेल मात्र, काही कारणाने तुम्ही पुन्हा जॉबकडे वळाला असाल तर ही गोष्ट रेझ्युमेमध्ये नमूद करा. तसेच मुलाखतीवेळी याबाबत सविस्तर सांगावे. फ्रिलान्सिंग करत असाल तर त्या कामाचा कसा फायदा झाला सांगा.  

स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय नवीन शिकायला मिळाले, त्याचा या जॉबमध्ये कसा फायदा होईल हे सांगावे. तुम्ही अप्लाय केलेल्या जॉबमध्ये लागणारी कौशल्ये आणि स्टार्टअप सुरू करताना आत्मसात केलेली कौशल्ये यांची सांगड घालण्याच प्रयत्न करा.

अप्लाय करण्यापूर्वीची तयारी?

करिअर ब्रेकनंतर अप्लाय करण्याआधी काही गोष्टींची पूर्वतयारी फायद्याची ठरू शकते. जसे की, तुम्ही ज्या क्षेत्रामधील कंपनीत जॉबसाठी अप्लाय करत आहात त्या रोलसाठी किती पगार दिला जातो. कोणकोणती कौशल्ये गरजेची आहेत ते जाणून घ्या.

जॉब पोर्टल किंवा लिंक्डइन सारख्या पोर्टवरून त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माहिती मिळवू शकता. त्यासाठी आधी नेटवर्क तयार करा. एचआर आणि त्या क्षेत्रात करणाऱ्या लोकांकडून तुम्हाला अंदाज मिळू शकले. त्या मुद्द्यांवर तुम्ही मुलाखतीवेळी जास्तीत जास्त बोला. करिअर गॅप असूनही त्या क्षेत्रातील चालू घडामोडींबाबत अपडेट असल्याचा संदेश जाईल.

जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी नोकरीपासून काही काळ दूर असाल तर तुम्ही शिकलेल्या गोष्टींचा जॉबमध्ये कसा फायदा होईल यावर मुलाखतीत भर द्या. तुमची चर्चा त्या विषयाभोवती जास्त ठेवा. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्यावर तुम्ही प्रभाव पाडू शकता.

करिअर गॅपवरुन स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करू नका

मुलाखतीवेळी करिअर गॅप लवपण्याचा किंवा खोटे बोलण्याचा प्रयत्न करू नका. जर स्पष्टपणे कारण सांगितले तर त्यातून तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. नोकरीपासून दूर असताना जर काही कोर्सेस केले असतील तर त्याचा नव्या कामात कसा फायदा होईल हे पटवून द्या. तसेच पुरावे म्हणून  तुमच्याकडे जर काही कागदपत्रे असतील तर ते मुलाखतीवेळी बरोबर ठेवा. जर तुम्ही आजारपणामुळे काही काळ ब्रेक घेतला असेल तर रुग्णालयाची कागदपत्रे बरोबर ठेवू शकता.

पगाराबाबत चर्चा करताना

पगाराबाबत वाटाघाटी करताना फक्त वार्षिक पॅकेज पाहू नका. जुन्या पगारावर वाढ मिळवण्याचा आधी प्रयत्न करा. त्यानंतर कंपन्यांकडून पगाराव्यतिरिक्त देण्यात येणारे फायदेही पाहा. जसे की, कंपनीची विमा पॉलिसी, रजा घेण्याचे नियम, साप्ताहिक सुट्टी किती दिवसांची आहे? पगारवाढ किती दिवसानंतर मिळते, व्हेरिएबल पे आणि त्या कामाचा भविष्यात करिअरसाठी होणारा फायदा या गोष्टीही ध्यानात घ्यायला हवा. जरी पगारात वाढ कमी मिळत असेल मात्र, बेनिफिट चांगले असतील तर ती ऑफर स्वीकारू शकता. 

पगाराबाबत वाटाघाटी करताना तुमची किमान पगार वाढीची अपेक्षा आधीच ठरवून घ्या. तुमच्या निर्णयावर ठाम राहा. बऱ्याच वेळा जर तुम्ही ठाम राहिलात तर तुम्हाला अपेक्षित असलेली वाढ मिळून जाते. मात्र, तुम्ही जर गोंधळलेले दिसलात की पगारवाढीची चर्चा तुमच्या मनाप्रमाणे पुढे जाणार नाही. मुलाखत आणि संपूर्ण एचआर सोबतच्या संभाषणात मोकळेपणा असावा. जर तुम्ही दडपणाखाली मुलाखत देत असाल तर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत.