Smartphone Safety Tips: आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आज आपल्या सर्वांच्या हातात स्मार्टफोन(Smartphone) आले आहेत. यामुळे एक डिजिटल इकोसिस्टम तयार झाली असून जिथे आपली अनेक कामे सहज आणि सोपी झाली आहेत. बँकिंगच्या कामापासून ते घरातील किराणामाल खरेदीपर्यंत अनेक महत्त्वाची कामे आपण आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने करत आहोत. मात्र याच स्मार्टफोनमुळे सायबर गुन्ह्यांच्या(Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. तुम्ही पण स्मार्टफोन वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्याकडून झालेला थोडासा निष्काळजीपणाही तुम्हाला मोठे नुकसान करून देऊ शकतो. तुमच्याकडेही स्मार्टफोन असेल तर त्यामध्ये व्हायरस(Virus) असण्याचीही दाट शक्यता असू शकते. आम्ही सांगितलेल्या पद्धतीचा वापर करून तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे तपासू शकता. चला, तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या पद्धतींचा वापर करून तुम्हीही तपासा तुमचा फोन
- तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हायरस(Virus) लपलेला असेल, तर स्मार्टफोनमधील मोबाईल डेटाचा वापर झपाट्याने वाढतो. व्हायरस तुमच्या स्मार्टफोनच्या पार्श्वभूमीत विविध कार्ये चालवत असतो
- याशिवाय तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारच्या पॉप अप जाहिराती(Pop Up Advertise) आल्या तर त्या मोबाईलमध्ये व्हायरस येण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असते
- कोणत्याही वापराशिवाय स्मार्टफोनची बॅटरी संपत असेल तर अशा परिस्थितीत तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस लपलेला असू शकतो
- तुमच्या स्मार्टफोनची प्रोसेसिंग गती ही पूर्वीपेक्षा कमी झाली असेल तर हे व्हायरस असण्याचे मोठे लक्षण असू शकते
- जर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनची सुरक्षा हवी असेल तर कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सवरून तुम्ही काहीही डाउनलोड करू नका