How To Identify That Smart Phone Screen Is Recording: सध्या आपण मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोन(Smartphone) वापरू लागलो आहोत. वाढत्या प्रगत तंत्रज्ञानासोबत सायबर क्राईमच्या(Cyber Crime) गुन्ह्यामध्ये देखील वाढ झाली आहे. बऱ्याचदा सायबर गुन्हे आपल्या सोबतच घडत आहेत हेच आपल्याला समजत नाही. हॅकर्स(Hacker) लोकांना फसवण्यासाठी रोज नवनवीन पध्दती शोधत असतात. त्यामुळे आपला डेटा चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. जर तुमचा फोन हॅक झाला असेल तर तुम्हाला ते माहित असणे गरजेचे आहे. सायबर गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्क्रीन रेकॉर्डींग होय. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करून तुमची स्क्रीन तुमच्याही नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवतात. तुमच्याही फोनची स्क्रिन कोणी रेकॉर्ड करतंय का? आणि जर करत असेल तर कसे बंद कराल हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
फोनचे स्क्रीन रेकॉर्ड होतंय हे कसं ओळखायचं?
स्मार्टफोनमध्ये असे काही फीचर्स(Features) असतात, जे तुमचे कोणतेही सेंसिटिव्ह फीचर्स(Sensitive Features) सुरू झाल्याची माहिती देतात. उदा. तुम्ही कॅमेरा ऑन केला की, कॅमेऱ्याच्या लोगोसोबत एक ग्रीन लाईट(Green Light) पाहायला मिळतो. माईकसोबत देखील असेच होते.
स्पायवेअर लपून छपून तुमचा फोन रेकॉर्ड(Record) करत असतील तर नोटीफिकेशन बारमध्ये एका ब्रॅकेटमद्ये एक कॅमेऱ्याचे साईन दिसेल. हा आयकॉन ब्लिंक होत राहतो. जेणेकरून तुमचं तिकडे लक्ष जाईल. यावरून तुमची स्क्रीन रेकॉर्ड होतीये समजून येईल. याशिवाय बॅटरी वेगात संपणे, अननोन अॅप्स इंस्टॉल होणे आणि डेटा वेगात संपणे यासारख्या गोष्टीमुळे सुद्धा समजून येते.
हे बंद कसं करावं?
- हा प्रकार बंद करण्यासाठी तुम्हाला सर्व संशयास्पद अॅप्समधून कॅमेरा आणि रेकॉर्डिंगच्या सर्व परमीशन रिमूव्ह(Permission remove) कराव्या लागणार आहेत
- काही वेळा युजर्सला आपली स्मार्टफोन फॅक्ट्री रिस्टोर सुद्धा करायला हवी