Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cyber Crimes Worldwide : सायबर चोर दिवसभरात किती मालवेअर (Malware) असलेल्या फाईल्स पाठवतात माहीत आहे का?

सायबर गुन्हे

सायबर सुरक्षेच्या बाबतीत रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीने एक मोठा इशारा दिला आहे. दिवसभरात त्यांची कंपनी किती मालवेअर असलेल्या फाईल्स पडते याचा धक्कादायक आकडाच त्यांनी जाहीर केलाय. आणि त्यामुळे इंटरनेट वापरताना आपण कसं सावध राहिलं पाहिजे याचा धडाच मिळतो. कारण, अशा फाईल्समुळे लोकांचं डेटा आणि पैसे असं दुहेरी नुकसान झालं आहे

वर्षं 2022मध्ये सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crimes) तब्बल 4,00,000 लाख मालवेअर (Malware) असलेल्या फाईल्स पाठवल्या किंवा वितरित केल्याचं रशियन कंपनी कॅस्परस्कायने (Caspursky) म्हटलं आहे. हा अहवाल खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण, दरवर्षी अशा मालवेअर असलेल्या फाईल्सच्या संख्येत वाढच होते आहे. आणि यातून लोकांचं डेटा आणि आर्थिक नुकसान होत आहे.    

गेल्यावर्षीच्या तुलनेत वितरित झालेल्या आणि पकडल्या गेलेल्या मालवेअर फाईल्सची संख्या 5%ने जास्त होती. हा आकडा जाहीर करताना कॅस्परस्काय कंपनीच्या मालकांनी आणखी एक इशारा दिला आहे. ‘सध्या ऑनलाईन व्यवहार आणि नवीन स्मार्टफोन तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढला आहे. ते पाहता पुढच्या वर्षी मालवेअर फाईलचं प्रमाण काही पटींनी वाढून अगदी 50,00,000 फाईल्सवर पोहोचू शकतं,’ असं व्लादिमीर कुस्कोव्ह म्हणाले.    

मालवेअर तयार करण्यासाठी आता सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचं ज्ञानही लागत नाही. मालवेअरसाठी तयार प्रोग्रामही असतात. त्यामुळे कुठलीही व्यक्ती मालवेअर तयार करू शकेल. आणि तसं झालं तर जागतिक व्यवस्थेसाठी ते धोकादायक असेल, असं कंपनीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.    

अलीकडे डेटा चोरीबरोबरच ऑनलाईन व्यवहारांमध्ये घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे. खासकरून क्रिप्टो आणि NFT बाजारपेठेत असे घोटाळे मोठ्या प्रमाणावर होतात. त्यासाठीही मालवेअरच वापरलं जातं.    

कॅस्परस्कायने मांडलेल्या अहवालात ऑनलाईन खंडणी मागणाऱ्या लोकांचाही उल्लेख झाला आहे. कारण, अहवालानुसार, 2021च्या तुलनेत खंडणी मागणाऱ्यांच्या प्रमाणात 181% वाढ झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सायबर गुन्हेगार विंडोज संगणक प्रणालीचा वापर करूनच हे गुन्हे करत आहेत. त्यामुळे तुमचा संगणक किंवा स्मार्टफोन अशा गुन्हेगारांपासून सुरक्षित ठेवणं हे मोठं आव्हान असेल.