Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Property tax receipt: मालमत्ता कराची पावती ऑनलाईन कशी मिळवू शकता?

Property tax receipt

Property tax receipt: कोणतीही खरेदी केल्यानंतर म्हणजेच पेमेंट्स केल्यानंतर त्याची पावती (receipt) घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण पेमेंट्स करतो तेव्हा पावती घेणे म्हणजे त्या आपण केलेल्या पेमेंट्स चे प्रूफ असते. त्याचबरोबर आपण जेव्हा मालमत्ता कर (Property tax) भरतो तेव्हा सुद्धा पावती घेणे महत्वाचे आहे.

Property tax receipt: कोणतीही खरेदी केल्यानंतर म्हणजेच पेमेंट्स केल्यानंतर त्याची पावती घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण पेमेंट्स करतो तेव्हा पावती  (receipt) घेणे म्हणजे त्या आपण केलेल्या पेमेंट्स चे प्रूफ असते. त्याचबरोबर आपण जेव्हा मालमत्ता कर (Property tax) भरतो तेव्हा सुद्धा पावती घेणे महत्वाचे आहे. मालमत्ता कराच्या पावतीमुळे (Property tax receipt) मालमत्ता धारकाचा मालमत्तेवरील हक्क सिद्ध होतो. वेळोवेळो कराच्या भरणा करणे हे कर्तव्यदक्ष नागरिकाचे लक्षण आहे, मालमत्ता कराची पावती ऑनलाइन कशी मिळवावी? हे जाणून घेऊया. 

मालमत्ता कराची ऑनलाईन पावती कशी मिळवू शकता? (How to Get Property Tax Receipt Online?)

डिजिटलायझेशनमुळे नागरिकांना आता कर भरल्याची पावती अगदी सहजपणे प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी मोठमोठ्या शहरातील महानगरपालिकेने नागरिकांना ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

  • महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (उदा, मुंबई महानगरपालिका)
  • याच वेबसाइटवर मालमत्ता कर ऑफलाईन / ऑनलाईन भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
  • Get property tax receipt online या पर्यायावर क्लिक करा. 
  • त्यानंतर `Tax Receipt’ हा पर्यायावर क्लिक करा.
  • विचारलेल्या डिटेल्स व्यवस्थित भरा, त्यानंतर `सबमिट’ करा. 
  • त्यानंतर तुमच्या मालमत्तेबद्दल माहिती समोर येते.  
  • त्यानंतर `Click Here to View Property Paid Details’ या पर्यायावर क्लिक करा. 
  • आता तुमच्या समोर दिसणार्या टेबल स्वरुपातील माहितीमध्ये Challan No. चा कॉलम दिसेल. 
  • आता तुम्हाला हव्या त्या Challan No. वर क्लिक करून तुम्ही संबंधित कर भरल्याची पावती प्राप्त करू शकता. 
  • आता तुम्हाला समोर एक नवी स्क्रिन दिसेल. यामध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या चलनाची सविस्तर माहिती दिसेल. 
  • त्याखाली “Click to Print receipt” हा पर्याय दिसेल.
  • चुकीची माहिती भरल्यास तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीची पावती मिळण्याची शक्यता असते.

आवश्यक माहिती (Required information) 

  • टॅक्स भरल्यानंतर आलेला मॅसेज (Transaction Message)
  • मालमत्ता क्रमांक  (Property Number)
  • पावती क्रमांक (Receipt  Number)
  • देय रक्कम (Amount Paid)