Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money transfer to wrong account : चूकीच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Google Pay

Money Transfer in wrong account : गूगल पे कडून काही ग्राहकांच्या खात्यात तब्बल 88 हजार रूपये जमा झाले आहेत. ही तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गूगलने त्या खातेधारकांना ईमेल करुन कळवलं की, “आम्ही जर हे पैसे परत घेऊ शकलो नाहीत तर हे पैसे तुमचे.” पण जर आपल्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर…

Money Transfer in wrong account : तुम्ही गूगल पे वापरत असाल आणि जर आज तुमच्या खात्यामध्ये तब्बल 88 हजार रूपये जमा झाले तर? हसू नका. असं झालं आहे. गूगल पे कडून ग्राहकांच्या खात्यामध्ये मोठ मोठ्या रकमा जमा (Deposit) झाल्या आहेत. पण जर हीच चूक आपल्याकडून घडली तर. जाणून घेऊयात चूकीच्या खात्यावर पैसे गेले तर ते परत कसे मिळवायचे.

चूकीच्या खात्यावर गेलेले पैसे परत कसे मिळवायचे

अनेकदा ऑनलाईन पेयमेंट करताना आपल्याकडून चूकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. अशावेळी हा व्यवहार रद्द करता येतो का की आपण पाठवलेले पैसे बुडतात असे प्रश्न आपल्याला नक्कीच पडले असतील. तर आपल्याकडून जर चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले गेले असतील तर ते आपल्याला परत मिळवता येतात.

गूगल पे च्या माध्यमातून जर आपल्याकडून हा चूकीचा व्यवहार झाला असेल तर आपण गूगल पे कडे रीतसर तक्रार नोंदवत आपले पैसे परत मिळवू शकतो. त्यासाठी तक्रार कशी नोंदवावी ते पाहुयात.

सर्वप्रथम आपल्याला गूगल पे अॅप ओपन करायचं आहे.. त्याठिकाणी आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं. या पेजवर आपल्याला सेटिंग्ज हापर्याय दिसेल त्यावर क्लिक करून त्यातील हेल्प आणि फिडबॅक हा पर्याय निवडावा. या पेजवर आल्यावर आपल्याला  गेट हेल्प हा पर्याय निवडल्यावर कॉन्टॅक्ट अज (contact Us) हा पर्याय निवडायचा आहे. या पेजवर आपल्याला सपोर्ट पेजवर आपल्याला आपली तक्रार नोंदवण्यासाठी जागा दिलेली असेल. गूगल पे कडून या तक्रारीवर बोलण्यासाठी आपल्याला ईमेल किंवा लाईव्ह चॅट असे दोन पर्याय दिलेले असतात. त्यातील कोणताही एक पर्याय निवडून आपण आपली तक्रार सविस्तररीत्या नोंदवायची आहे. त्यानंतर गूगल पे च्या माध्यस्थीने आपल्याला दोन दिवसामध्ये पैसे परत मिळू शकतात.

गूगल पे कडून ग्राहकांच्या खात्यात पैसे

गूगल पे कडून काल दिवसभरात त्यांच्या ग्राहकांच्या खात्यामध्ये तब्बल 88 हजार रूपये जमा झाले. ही घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. नक्कीच गूगल पे कडून कोणताही लक्की ड्रॉ काढला नव्हता. नाही गूगलने हे पैसे ग्राहकांना रिवार्ड किंवा कॅशबॅक म्हणून दिले. गूगल पे कडून हा व्यवहार तांत्रिक चूकीमुळे झाला होता. ही चूक लक्षात येताच गूगलने काही ग्राहकांना ईमेल करून या चूकीच्या व्यवहाराबद्दल माहिती देत आपले पैसे परत मिळवले. पण ज्या ग्राहकांनी हे पैसे वापरले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची अॅक्शन घेणार नसल्याचं ही गूगलने स्पष्ट केलं.