Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mortgage Loan Offer: घरासाठी मॉर्गेज लोन घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे?

Best Mortgage Loan Offer

Mortgage Loan Offer: घर खरेदी करताना आणि त्यासाठी कर्ज घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या तारण कर्जाच्या ऑफर्स जाणून घेऊन त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणे योग्य ठरू शकते. तर आज आपण तारण कर्जाच्या (Mortgage Loan) विविध ऑफरबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Mortgage Loan Offer: घर घेताना बँकेकडून कर्ज घेणे, ही आता अपरिहार्य गोष्ट झाली आहे. म्हणजे कर्जाशिवाय नवीन घर खरेदी करता येत नाही. कारण नवीन घर घेण्याइतपत सगळ्यांकडेच पुरेसे पैसे असतात, असे नाही आणि असले तरी इन्कम टॅक्स कायद्यातील तरतुदीनुसार ते नियमांमध्ये बसवणे ही गरजेचे आहे. तर आज आपण तारण कर्जाच्या (Mortgage Loan) विविध ऑफरबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

घर खरेदी करताना आणि त्यासाठी कर्ज घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या तारण कर्जाच्या ऑफर्स जाणून घेऊन त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणे योग्य ठरू शकते. यासाठी वैयक्तिक पातळीवर तुमचे पेपर वर्क होणे आवश्यक आहे. जसे की, तुम्ही किती रुपयांपर्यंत घर पाहत आहात. त्यासाठी डाऊन पेमेंट म्हणून तुमच्याकडे किती पैसे उपलब्ध आहे आणि तुम्हाला किती रुपयांचे कर्ज लागणार आहे. याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे. कारण या माहितीच्या आधारावर तुम्हाला कोणत्या प्रकारचे कर्ज मिळू शकते. त्याचा कालावधी किती असेल? आणि त्यासाठी बँक काय व्याजदर आकारणार, हे कळू शकते.

होम लोन घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे

कर्ज घेण्यापूर्वी काही बेसिक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही चांगली ऑफर स्वीकारून कर्जाचा निर्णय घेऊ शकता.

तारण कर्जाचे प्रकार (Types of Mortage Loan)

बँकांकडे तारण कर्जाचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असतात. या प्रत्येक कर्जाच्या काही चांगल्या आणि वाईट बाजू आहेत. त्याची माहिती घेऊन आपल्याला ज्या प्रकारचे तारण कर्ज आवश्यक आहे. त्याची निवड करावी.

डाऊन पेमेंट (Down Payment)

बँकांकडून 100 टक्के कर्ज मिळत नाही. होम लोनचा विचार केला तर घराच्या एकूण किमतीपैकी बँका 80 ते 85 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. त्यामुळे उर्वरित 15 ते 20 टक्के रक्कम ही डाऊन पेमेंट म्हणून द्यावी लागते. त्यामुळे त्याची तरतूद करणे गरजेचे आहे. डाऊन पेमेंट जितके जास्त असेल तेवढे कर्ज कमी घ्यावे लागते. त्यामुळे कर्ज घेताना डाऊन पेमेंट किती करणार याचाही विचार करणे आवश्यक आहे.

कर्जाचा व्याजदर (Loan Interest Rate)

कर्जाचा व्याजदर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगवेगळे असतात. त्यामुळे जी बँक सर्वात कमी व्याजदराने कर्ज देते त्याची निवड करणे गरजेचे आहे.

कर्जाची परतफेड (Loan Pre-Payment)

होम लोनचा कालावधी हा साधारण 20 ते 30 वर्षांचा असतो. तसेच होम लोनचा कालावधी जितका जास्त असतो. तितका त्याचा मासिक ईएमआय आणि व्याजदर कमी बसू शकतो. त्यामुळे घरासाठी कर्ज घेताना हा कालावधी आणि त्यावर बँकेकडून दिला जाणारा व्याजदर तपासून घेणे आवश्यक आहे.

होम लोन घेताना ही बेसिक माहिती तुमच्याकडे असेल तर तुम्ही कर्ज घेण्याचा निर्णय लगेच घेऊ शकता किंवा जो कोणता बेस्ट रेट तुम्हाला मिळेल. त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण वेगवेगळ्या प्रकारच्या तारण कर्जातून चांगली ऑफर कशी निवडायची. त्यासाठी कोणते घटक तपासले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊ.

  • कर्जाची रक्कम
  • व्याजदर
  • मासिक हप्ता
  • प्री-पेमेंट सुविधा


घरासाठी तारण कर्ज घेताना आणि वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्समधून तुमच्यासाठी बेस्ट ऑफर निवडताना वरील गोष्टींची माहिती घ्यावी. वेगवेगळ्या ऑफर्समधून तुम्हाला नेमका कोणत्या गोष्टींमुळे फायदा होऊ शकतो. हे तुमच्यापेक्षा दुसरा कोणी सांगू शकत नाही. पण फायद्याच्या कोणत्या गोष्टी असू शकतात. त्यासाठी वरीलप्रमाणे काही पॅरामीटर फिक्स केले तर त्यातून चांगली ऑफर निवडताना तुम्हाला अडचण येणार नाही.