Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

Image Source : www.newsbytesapp/www.daymetcu.com

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप अॅप व वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र, ते वापरण्यासाठी चार्ज द्यावा लागतो. तसेच, बरीच माहिती ही द्यावी लागते. त्यामुळे लोक जी प्रसिद्ध वेबसाईट आहे अशाच ठिकाणावरून प्रीमियम भरून CIBIL स्कोअर चेक करतात. आता CIBIL स्कोअर Google Pay वर तुम्हाला मोफत चेक करता येणार आहे.

गुगल पे (Google Pay) युजर्सला सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी सतत कार्यरत आहे. यामुळेच त्यांच्या अॅपमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापासून ते बिलं भरण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता यात कंपनीने आणखी एक भर टाकली आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने TransUnion CIBIL यांच्यासोबत पार्टनरशीप केली. त्यांनतर कंपनीने युजर्सला मोफत CIBIL स्कोअर चेक करता यावा यासाठी हे फीचर अॅपवर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे युजर्सला आता घरबसल्या CIBIL स्कोअर चेक करता येणार आहे. 

याआधी युझर्सला CIBIL च्या वेबसाईटवर जाऊन CIBIL स्कोअर चेक करावा लागायचा. विशेष म्हणजे यासाठी प्रीमियम द्यावे लागत होते. मात्र, Google Pay ने हे फीचर मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आता युजरला सोयीचे झाले आहे.

लोनसाठी CIBIL स्कोअर कामाचा

तुम्ही कोणत्याही बँकेत लोनसाठी गेल्यास, तुमचा CIBIL स्कोअर पाहूनच तुम्हाला लोन द्यायचे की नाही हे ठरवले जाते. त्यामुळे कोणत्याही बँकेतून लोन घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर चांगला असायला हवा. CIBIL स्कोअरलाच क्रेडिट स्कोअरही म्हटले जाते. तसेच, CIBIL चे पूर्ण स्वरूप क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. CIBIL स्कोअर हा 3 अंकांचा असतो. 300 ते 900 च्या दरम्यान तुमचा CIBIL स्कोअर असला तर तो चांगला मानला जातो. जर तो 300 च्या कमी असेल तर तो खराब CIBIL स्कोअर ठरतो. एवढ्या कमी स्कोअरवर तुम्हाला कोणतीच बँक लोन देणार नाही. परंतु, जर तुमचा स्कोअर 750 पर्यंत असेल तर तो सर्वांत चांगला मानला जातो. त्यामुळे तुम्हाला या फीचरमुळे स्कोअरवर लक्ष ठेवणं सोप होईल. सतत लक्ष असल्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता उरणार नाही. यामुळे, बँकेतून लोन मिळवणं ही सहज होईल. तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्ही Google Pay वर त्वरित पर्सनल लोनही मिळवू शकता.

Google Pay वर CIBIL स्कोअर पाहायचा कसा?

Google Pay वर, तुमचा CIBIL स्कोअर चेक करणं मोफत आणि सोपं आहे आणि यामुळे तुमच्या सध्याच्या स्कोअरवर कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही पूर्वीपासून वापरत असाल तर अॅप अपडेट करावे लागेल. अपडेट केल्यावर वर स्क्रोल केल्यानंतर तळाला व्यवहार हिस्ट्रीच्यावर तुमचा CIBIL स्कोअर चेक करा असं दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर दिसेल. जर नवीन युजर असाल तर खालील स्टेप फाॅलो करा.

  • अॅप इन्स्टाॅल करा
  • “तुमचे पैसे मॅनेज करा”वर क्लिक करा, पुढे जा
  • “मोफत तुमचा CIBIL स्कोअर चेक करा” लिंक वर क्लिक करा.
  • तुम्ही पहिल्यांदा वापरत असल्यास तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर, ई-मेल अॅड्रेस(पर्यायी), आणि PAN (पर्यायी) टाकावा लागेल.

ह्या गोष्टी केल्यांनतर तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला दिसेल. त्यानुसार तुम्ही मग त्यावर लक्ष ठेवू शकता. जर खराब असेल तर चांगला कसा करता येईल या दृष्टीने पावलं उचलू शकता.