Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Buy Oyo Franchise in India: जाणून घ्या, भारतात Oyo ची फ्रेचाइंजी कशी खरेदी करायची

How to Buy Oyo Franchise in India

Image Source : http://www.entrepreneur.com/

Ritesh Agarwal: ओयो (Oyo) ने फार कमी वेळेत प्रचंड यश मिळविले आहे. रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यांनी 2013 मध्ये ओयाचा कार्यभार सुरू केला होता. आज हा ब्रॅड देशभरात विस्तारला आहे. विशेष म्हणजे मलेशिया व नेपाळसारख्या देशात देखील या ब्रॅंडबाबत विश्वास निर्माण झाला आहे. मात्र भारतात फार कमी कालावधीत Oyo ने बाजारात कब्जा केला आहे. या ब्रॅंडची फ्रेचाइंजी कशी घेतात, ते पाहूयात.

How can I get OYO franchise in India: ओयो (OYO) म्हणजे अशी कंपनी जी लोकांना रेंटवर चांगले हाॅटेल किंवा रूम्स बुक करून देते. Oyo चा फुलफाॅर्म On Your On Room असा आहे. भारतात फार कमी वेळेत Oyo ने आपले स्थान भक्कम केले आहे. भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात Oyo चा ब्रॅंड नजरेस येतो. या ब्रॅंडने अत्यंत कमी कालावधीत उंच भरारी घेतली आहे. तुम्हालादेखील Oyo सोबत यशस्वी व्हायचे असेल, तर Oyo ची कशा पध्दतीने फ्रेचाइंजी घेतात, ते जाणून घेवुयात.

रजिस्टर (Register)

सर्वप्रथम OYO वेबसाइटला भेट द्या आणि यानंतर रजिस्टर रूमसाठी रजिस्टर फॉर्म भरा.यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या प्लॅट किंवा घरासहित तुमचे नाव, मोबाइल फोन नंबर आणि पत्ता ही वैयक्तिक माहिती अपडेट करा. हा फॉर्म सबमिट करण्यासाठी OYO  वर टॅप करा आणि OYO रूम्ससह पार्टनरशीप सुरू करा. OYO रूम्ससाठी रजिस्टर करण्यासाठी तुम्ही partner@oyorooms.com वर ईमेल करू शकता किंवा OYO फ्रँचायझी +91 7053070530 या मोबाईल नंबरवर काॅलदेखील करू शकता. 

टीमशी चर्चा करा (Discuss with The Team)

तुम्ही अर्ज भरल्यानंतर, एक ईमेल पाठवल्यानंतर किंवा पार्टनर बनण्याबाबत चर्चा करण्यासाठी OYO रूम्स टीमचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. तुम्ही तुमच्या पत्त्याचा आणि ओळखीचा पुरावा दिला आहे की नाही, आणि तुम्ही OYO रूम्स पार्टनरशिप करारावर स्वाक्षरी केली आहे की नाही हे तो ही सर्व माहिती पडताळून पाहील.

Oyo शी जोडले जाईल (Will tie up with Oyo)

एकदा औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, तुमची व्यावसायिक मालमत्ता, हॉटेल किंवा घर OYO रूम्स अॅप आणि वेबसाइटवर तुम्ही जोडले जाणार आणि तुम्ही OYO रूम्सद्वारे अतिथी स्वीकारण्यास सक्षम बनाल.

प्रशिक्षण (Training)

OYO सोबत असलेल्या फ्रँचायझींनादेखील इतर फ्रँचायझींप्रमाणेच सेवा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये मुख्य कार्यालयाकडून इंडक्शन प्रशिक्षण आणि फ्रँचायझी स्थापन करण्यात व्यावसायिक मदत यांचा समावेश करण्यात आला आहे.

कराराची मुदत (Term of contract)

OYO आणि फ्रँचायझी ही पाच वर्षांची असते. यानंतर तुम्ही याचे नूतनीकरणदेखील करू शकता.