Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan on EPF: ईपीएफवर ऑनलाईन कर्ज काढता येणे शक्य; प्रक्रिया जाणून घ्या

how to apply online for epf loan

Loan on EPF: ईपीएफ खात्यातून मिळणारी रक्कम ही सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक आधार असतो. मात्र नोकरी करत असताना तुम्हाला या पैशांची गरज पडल्यास तुम्ही त्याचा वापर करू शकता. या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हे कर्ज कसे काढायचे याची प्रक्रिया जाणून घेऊ.

नोकरदार वर्गाला दरमहा पीएफ खात्यात ठराविक रकमेची गुंतवणूक करावी लागते. जसजसा नोकरीचा कालावधी वाढतो. त्यानुसार या खात्यातील गुंतवणूक सुद्धा वाढते. परिणामी दीर्घकालावधीनंतर या खात्यात मोठी रक्कम जमा होते. ही रक्कम कर्ज स्वरूपात काढता येते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर याचे उत्तर होय असे आहे. गरज भासल्यास ही रक्कम काढता येणे शक्य आहे. तसेच या कर्जाची परतफेड देखील करण्याची आवश्यकता नाही. कारण ही रक्कम तुमच्या बचतीतून मुदतीपूर्वी तुम्ही आगाऊ काढू शकता. सर्वप्रथम EPFO विभाग खातेदाराची चौकशी करून हे कर्ज मंजूर करते. खातेधार पुढील कारणांसाठी पीएफ खात्यातून कर्ज काढू शकतो.

या कारणांसाठी EPF मधून कर्ज घेता येते

  • स्वतःच्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या शिक्षणासाठी पीएफ खात्यातून कर्ज घेता येते. 
  • मुलगा, मुलगी किंवा स्वतःच्या लग्नासाठी कर्ज काढता येते. 
  • घर किंवा प्लॉट खरेदी करताना डाऊंट पेमेंटसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. अशावेळी पीएफ खात्यातून कर्ज घेता येते.
  • कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी EPF मधून पैसे काढ येतात. पण ईपीएफवरील कर्ज हे फक्त गंभीर आजारावरच काढता येते.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे एखादे मोठे नुकसान झाल्यास खातेदार PF मधून पैसे काढू शकतो.
  • राहत्या घराच्या डागडुजीसाठी PF मधून रक्कम काढता येते. 

कर्ज काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या

तुमच्या EPF खात्यावर जर तुम्हाला कर्ज काढायचे असेल तर तुम्ही बँक खात्याचा आधार घेऊन ऑनलाईन KYC द्वारे कर्जासाठी अर्ज करता येतो. यासाठी खातेधारकाचा मोबाईल क्रमांक UAN सोबत लिंक असणे गरजचे आहे. हे कर्ज काढण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.  

  • सर्वप्रथम EFPOच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि लॉग इन करा
  • ऑनलाईन सेवा क्लेम विभागात प्रवेश करा
  • व्हेरीफीकेशन करण्यासाठी बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाका
  • त्यानंतर  "Proceed for Online Claim" वर क्लिक करा.
  • खाली दिलेल्या मेनूमधून पीएफ अॅडव्हान्स/फॉर्म 31 निवडा.
  • या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून कर्जाची रक्कम व चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि पत्ता टाका.
  • “Get Aadhaar OTP” वर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.

वरील सर्व माहिती भरल्यास तुमच्या कर्ज प्रक्रियेला सुरवात होईल व शासकीय कामाच्या 7 दिवसांच्या आत हे कर्ज तुम्हाला मिळेल.

EPF कर्ज काढण्याची मर्यादा 

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना ईपीएफ खात्यातून फक्त मर्यादित रक्कम काढण्याची परवानगी देते. ही रक्कम ईपीएफ कर्ज काढण्याच्या कारणावर अवलंबून असते. तुमचा खर्च लक्षात घेऊन ही रक्कम देण्यात येते.

ईपीएफ कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • फॉर्म 19 - अंतिम सेटलमेंटसाठी
  • फॉर्म 10C - पेन्शन काढण्यासाठी
  • फॉर्म 31 - अडचणीच्या परिस्थितीत मोजके पैसे काढण्यासाठी

Source: www.paisabazaar.com