Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TAN: कर कपात आणि संकलन खाते क्रमांक कसा मिळवाल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Tax Deduction and Collection Account Number

Tax Deduction and Collection Account Number या 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांकाच्या मदतीने कुणा कंपनीचा किंवा व्यक्तीचा कर भरणा किंवा संकलनाचा संपूर्ण लेखाजोखा उपलब्ध होतो. जर तुम्ही कुठला व्यवसाय चालवत असाल किंवा कर्मचार्‍यांना पगार देत असाल, तर तुम्हाला TAN मिळवणे आवश्यक आहे.

टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर (Tax Deduction and Collection Account Number) म्हणजेच तुमची आतापर्यत केली गेलेली कर कपात आणि कर संकलन यांची माहिती देणारा एक अद्वितीय क्रमांक.  नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेड (National Securities Depository Limited) करदात्यांना हा क्रमांक देते. या 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांकाच्या मदतीने कुणा कंपनीचा किंवा व्यक्तीचा कर भरणा किंवा संकलनाचा संपूर्ण लेखाजोखा उपलब्ध होतो. जर तुम्ही कुठला व्यवसाय चालवत असाल किंवा कर्मचार्‍यांना पगार देत असाल, तर तुम्हाला TAN मिळवणे आवश्यक आहे.

TAN चा वापर पगार, व्याज, लाभांश इत्यादींच्या वजावटीसाठी केला जातो. हा क्रमांक कर परतावा, चलन आणि कर प्रमाणपत्रांसाठी वापरला जाऊ शकतो.

TAN कसा मिळवाल?

  1. सर्वप्रथम NSDL च्या वेबसाइटला भेट द्या 
    TAN मिळवण्याची पहिली पायरी म्हणजे NSDLच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. TAN जारी करण्याचे सर्वाधिकार सरकारने  नॅशनल सिक्युरिटीज डिपॉजिटरी लिमिटेडला  (National Securities Depository Limited) दिले आहेत.
  2. TAN अर्ज फॉर्म निवडा 
    NSDL वेबसाइटवर, तुम्हाला TAN अर्ज फॉर्म (TAN Application Form), फॉर्म 49B निवडावा लागेल.
  3. TAN अर्ज भरा 
    तुम्हाला नाव, पत्ता, पॅन (PAN Number),तुमची श्रेणी (व्यावसायिक, व्यक्ती, सरकारी संस्था, निमसरकारी संस्था इत्यादी) आणि इतर संबंधित माहिती यासारख्या आवश्यक तपशीलांसह TAN अर्ज भरावा लागेल.
  4. TAN अर्जाची फी भरा 
    एकदा की तुम्ही TAN अर्जासाठी आवश्यक ती माहिती भरली की, तुम्हाला TAN मिळवण्यासाठी फी भरावी लागेल. तुम्ही ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे ही फी भरू शकता.
  5. TAN अर्ज सबमिट करा 
    TAN अर्जाची फी भरल्यानंतर, तुम्हाला आवश्यक कागदपत्रांसह TAN अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष फॉर्म सबमिट करू शकता.
  6. तुमचा TAN मिळवा 
     तुमच्या TAN अर्जावर प्रक्रिया आणि पडताळणी झाल्यावर 15 दिवसांच्या आता तुम्हाला तुमचे TAN प्रमाणपत्र नोंदणीकृत पत्त्यावर मिळेल. तुम्ही TAN प्रमाणपत्र ऑनलाइन देखील डाउनलोड करू शकता.

TAN आधारित पेमेंटसाठी क्विक लिंक्सv(Quick Links) अंतर्गत आयकर पोर्टलच्या होमपेजवर CSI (Challan Status Inquiry) फाइल डाउनलोड करण्याची सुविधा या वर्षीपासून आयकर विभागाने सुरु केली आहे. CSI (चलन स्थिती चौकशी) फाइल प्राप्तीकर रिटर्न तयार करताना वर्षभराच्या आर्थिक उलाढालीचा लेखाजोखा सादर करते, त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात केली गेलेली कर कपात आणि कर संकलन यांची माहिती एका क्लिकवर नागरिकांना मिळणार आहे. 

TAN साठी अर्ज करताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा

  • TAN अर्जाची फी रु. 65 (कर वगळून) तुम्हांला भरावी लागेल
  • TAN अर्जाचा फॉर्म सर्व आवश्यक माहितीसह अचूकपणे भरलेला असणे आवश्यक आहे., माहितीमध्ये त्रुटी आढळ्यास तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो हे लक्षात ठेवा. 
  • TAN अर्जावर तुमची अधिकृत स्वाक्षरी आणि शिक्का (व्यवसाय/कंपनी असेल तर) असणे आवश्यक आहे.
  • TAN साठी अर्ज करताना तुम्हाला वैध पॅन कार्ड प्रदान करणे आवश्यक आहे.
  • TAN अर्जावर प्रक्रिया आणि पडताळणी होण्यासाठी दोन आठवडे (15 दिवस) लागू शकतात.

खरे तर TAN मिळवणे ही एक साधीसोपी प्रक्रिया आहे. आवश्यक त्या माहितीसह सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास विनाअडथळा 15 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा कर कपात आणि संकलन खाते क्रमांक मिळू शकतो.