Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रॅन्समवेअरचा तुमच्या बिझनेसवर कसा परिणाम होऊ शकतो?

ransomware attack 2022

रॅन्समवेअर व्हायरसमुळे (Ransomware virus) कंपनीचा डेटा तसेच इतर महत्वाची माहितीला धोका पोचू शकतो.

मागील काही वर्षात सायबर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात रॅन्समवेअर (Ransomware) सारख्या खंडणीखोर व्हायरसने उद्योजक (ransomware attack on company) आणि वित्तीय संस्थांना जेरीस आणले आहे. अशा सायबर हल्ल्यामुळे (ransomware attack) कंपन्यांचे आर्थिकच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही मोठे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक कंपनीने जागृत असणे गरजेचे आहे. तसेच त्यासंबंधी उपाययोजनाही करणे गरजेचे आहे.

रॅन्समवेअर व्हायरस कसा काम करतो (How ransomware works)

रॅन्समवेअर हा व्हायरस (ransomware virus) संगणक किंवा स्मार्टफोनवर हल्ला करतो. या हल्ल्यात हल्लेखोर आपल्याकडे असणाऱ्या सर्व फाइल्स एनक्रिप्ट करून टाकतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास आपल्या फाइल्स आणि माहिती अशा अगम्य भाषेत रूपांतरित केली जाते की त्यामुळे आपल्याला या फाइल्स उघडता येत नाहीत. यानंतर आपल्याला स्क्रीनवर ‘काही ठरावीक रक्कम अमुक एक खात्यात भरून आपण आपल्या फाइल्स आणि माहिती पूर्ववत करून घेऊ शकता’ असा संदेश दाखवला जातो. आताच्या काळात तर आभासी चलन म्हणजे बिटकॉइनसारख्या माध्यमातून ही खंडणी घेतली जाते. बरेचसे वापरकर्ते ही खंडणीची रक्कम हल्लेखोरांच्या खात्यात जमा करतात. परंतु यानंतरदेखील हल्लेखोर आपली माहिती पूर्ववत करेलच याची शाश्वती देता येत नाही.

ransomware attack meaning

रॅन्समवेअरचा भारतावर हल्ला (Ransomware attacks on India)

2021 या वर्षांत भारतात आजवरचे सर्वाधिक रॅन्समवेअर हल्ले झालेले पाहायला मिळतात. रॅन्समवेअर मालवेअरला (ransomware attack 2022) बळी पडलेल्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतो. दर आठवडय़ाला सुमारे 200 तंत्रज्ञान प्रणालींवर रॅनसमवेअर हल्ले झाल्याचं पाहायला मिळालं. या हल्ल्याकडे एक ‘व्हायरस’ असं बघून सामान्य माणसं त्याकडे दुर्लक्ष करत असली तरी हा केवळ मोठय़ा कंपन्या अथवा संघटनांवर होणारा हल्ला नसून आपल्यासारख्या सामान्य वापरकर्त्यांपर्यंत (ransomware attack on small business) यापूर्वीच येऊन पोहोचलेला मालवेअरचा एक प्रकार आहे.

रॅन्समवेअरचा उद्योगांवर परिणाम  (impact of ransomware attacks on industries)

या हल्ल्यामध्ये मोठ्या उद्योगांच्या सायबरसुरक्षेवर प्रश निर्माण होतो. तसेच त्यांच्या ब्रँडला धक्का लागण्याची शक्यता असते. यासाठी मोठमोठ्या उद्योजक कंपन्या वेगळा निधी ठेवतात. तरीही सायबरसुरक्षा उल्लंघनामुळे 46 टक्के संस्थांना त्यांच्या प्रतिष्ठा आणि ब्रँड मूल्याचे नुकसान झाले आहे. आणखी 19 टक्के संस्थांना तृतीय-पक्षाच्या सुरक्षा उल्लंघनामुळे किंवा IT सिस्टीम अयशस्वी झाल्यामुळे प्रतिष्ठा आणि ब्रँडचे नुकसान झाले आहे.

रॅन्समवेअर हल्ला कसा ओळखावा (How to identify a ransomware attack)

आपल्याकडील कोणत्याही संगणकीय किंवा स्मार्टफोनसारख्या उपकरणावर रॅन्समवेअर हल्ला होण्याची शक्यता आहे हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. कोणत्याही ई-मेलमध्ये किंवा आपल्याकडे आधीच असलेल्या फाईल्समध्ये दोन एक्स्टेन्शन असणारी फाईल किंवा ई-मेल अटॅचमेंट दिसल्यास ती रॅन्समवेअर हल्ल्यासाठीची पूर्वतयारी आहे, असे समजावे. दोन एक्स्टेन्शन म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एखादी डॉक्युमेंट फाईल असेल तर तिचे सर्वसाधारण एक्स्टेन्शन हे ‘डॉक’ (doc) किंवा ‘डॉकएक्स’ (docx) असे असते. अशा प्रकारची फाईल उघडून न पाहता त्वरित डिलीट करा. याद्वारे आपण प्राथमिक स्वरूपात काही प्रमाणावर हा रॅन्समवेअर हल्ला (ransomware attack) ओळखून त्याला रोखू शकतो. परंतु याव्यतिरिक्त इंटरनेटच्या माध्यमातून इतर मार्गानेदेखील रॅन्समवेअर हल्ला केला जाऊ शकतो. त्यासाठी वेगळ्या प्रकारे दक्षता घेणे आवश्यक आहे.

ransomware attack 2022

आपली कंपनी, व्यवसाय आणि गोपनीय माहिती अशाप्रकारच्या सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायची असेल, अनोळखी लिंक आणि ईमेल पासून सावध राहा.