Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Pension Scheme: NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

NPS

National Pension Scheme: NPS ही भारत सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था करू शकता. NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

National Pension Scheme: भारतीय पोस्टाने 'राष्ट्रीय पेन्शन योजना' (NPS) खाते ऑनलाइन उघडण्याची सेवा खूप आधीपासून सुरू केली आहे. कोणताही भारतीय नागरिक आणि 18 ते 70 वर्षे वयोगटातील अनिवासी भारतीय भारतीय पोस्टद्वारे त्यांचे एनपीएस खाते ऑनलाइन उघडू शकतात. NPS ही भारत सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था करू शकता. 1 जानेवारी 2004 पासून ही योजना  सुरू झाली. विशेष म्हणजे खाजगी क्षेत्रात काम करणारे लोकही या योजनेत खाते उघडू शकतात.

  • अधिकृत वेबसाईटवरील नोंदणीवर क्लिक करा आणि आधार पर्यायासह नोंदणी निवडा. 
  • आधार क्रमांक टाकल्यानंतर जनरेट ओटीपी पर्यायावर क्लिक करा
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल
  • तुमचे लोकसंख्येचे डिटेल्स आणि फोटो आधार डेटाबेसमधून प्राप्त  केले जातील. 
  • तुम्हाला सर्व अनिवार्य डिटेल्स ऑनलाइन भरावे लागतील.
  • नोंदणीसाठी तुम्हाला तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरीअपलोड करणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला आधारवरून मिळालेला फोटो बदलायचा असेल तर तुम्ही स्कॅन केलेला फोटो अपलोड करू शकता.
  • डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे NPS खात्यात पेमेंट करण्यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवेवर निर्देशित केले जाईल.

NPS मधून अंतिम पैसे काढल्यावर 60% रक्कम करमुक्त आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात योगदान मर्यादा 14  टक्के आहे. कोणताही NPS ग्राहक प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80CCD (1) अंतर्गत एकूण उत्पन्नाच्या 10% पर्यंत कर कपातीचा दावा करू शकतो, ज्याची एकूण मर्यादा कलम 80CCE अंतर्गत, 1.5 लाख आहे. सदस्य कलम 80CCE अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकतात.

NPS मध्ये कोण गुंतवणूक करू शकते? (Who can invest in NPS?)

  • केंद्रीय कर्मचारी
  • राज्य कर्मचारी
  • खाजगी क्षेत्रातील कर्मचारी
  • सामान्य नागरिक

  • NPS अकाऊंट 2 प्रकारचे असतात. 
  • पहिला टियर 1 दुसरा टियर 2 
  • टियर 1 ओपन केल्याशिवाय टियर 2 ओपन होत  नाही. 
  • टियर 1 सक्रिय ठेवण्यासाठी 1000 रुपये अकाऊंटमध्ये असावे लागते. 
  • या गुंतणूकीवर वार्षिक 40% खरेदी करणे आवश्यक आहे. 
  • 60 वर्षानंतर 60 टक्के रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता आहे. 
  • या अकाऊंटमध्ये गुंतवणूक न केल्यास खाते गोठवले जाते आणि inactive केले जाते. 

इन्कम टॅक्सला कसा फायदा होतो? (How is income tax beneficial?)

इन्कम टॅक्स  कायद्याच्या कलम 80 सीसीडी (1) 80 सीसीडी (1 बी) आणि 80 सीसीडी (2) अंतर्गत टॅक्स सूट मिळते.  कलम 80 सी म्हणजेच 1.50 लाख रुपयांव्यतिरिक्त एनपीएसवर आणखी 50,000 रुपयांची सवलत मिळण्याची शक्यता आहे.  एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यास  2 लाख रुपयांच्या इन्कम टॅक्स सवलतीचा आनंद घेऊ शकता. 

गुंतवणूक कधी सुरू करू शकता? (When can you start investing?)

  • घरबसल्या सर्व प्रोसेस करू शकता. 
  • वयाच्या 21 व्या वर्षी गुंतवणूक सुरू करू शकता. 
  • त्यात तुम्हाला तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपये गुंतवावे लागणार आहे. 
  • वयाच्या 60  व्या वर्षापर्यंत 39 वर्षे गुंतवणूक करून वार्षिक गुंतवणूक 54000 रुपये असणार आहे. 
  • 39 वर्षांत एकूण गुंतवणूक 21.06 लाख रुपये असणार आहे. 
  • एनपीएस रिटर्न 10% असेल तर मॅच्युरिटीवरील रक्कम 2.59 कोटी रुपये असेल. 
  • तसेच निवृत्तीनंतर 51,848 रुपये पेन्शन मिळणार आहे.