Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Railway General Ticket: जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळात ट्रेन पकडायची? रेल्वेचा नियम काय सांगतो

Railway General Ticket

Image Source : www.irctchelp.in

Railway General Ticket: आपण बरेच जण जनरल तिकीट काढून रेल्वेने प्रवास करतो. पण हे तिकीट कधीपर्यंत वैध असते? आपण किती वेळात ट्रेन पकडून प्रवास करावा याची माहिती आजच्या लेखातून जाणून घ्या.

Railway General Ticket: भारतात जवळचा पल्ला असो किंवा दूरचा बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. भारतीय रेल्वे अनेक गाड्या चालवते, ज्यामध्ये पॅसेंजर मेल, मेल एक्सप्रेस, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट अशा अनेक रेल्वे आहेत. या गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे डबे असून जवळपास प्रत्येक ट्रेनमध्ये जनरल बोगी असते. यामध्ये प्रवास करण्यासाठी जनरल तिकीट काढावे लागते. हे सर्वात स्वस्त तिकीट असून कमी अंतराच्या प्रवासासाठी लोक जनरल डब्यातून प्रवास करतात. आता प्रश्न पडतो की जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर आपण किती वेळानंतर प्रवास सुरू करू शकतो. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की जे जनरल तिकीट खरेदी करतात ते दिवसभरात कधीही ट्रेनमध्ये चढू शकतात. पण, हा एक गैरसमज आहे. जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्ही फक्त तीन तासाच्या आत ट्रेनमधून प्रवास करू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जनरल तिकीट खरेदी कराल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा.

रेल्वेचा नियम काय सांगतो?

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्हाला 199 किलोमीटरचा प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला जनरल तिकीट काढल्यानंतर ३ तासांच्या आत ट्रेन पकडावी लागणार आहे. 200 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरासाठी, तीन दिवस अगोदर जनरल  तिकीट काढता येते. जर एखाद्या प्रवाशाने 199 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या प्रवासासाठी तिकीट काढले असेल, तर त्याला ज्या स्थानकावर जायचे आहे त्या स्थानकावर जाणारी पहिली ट्रेन निघेपर्यंत किंवा तिकीट खरेदी केल्यानंतर 3 तासांमध्ये प्रवास सुरू करावा लागतो. 2016 मध्ये रेल्वेने जनरल तिकिटांची अंतिम मुदत निश्चित केली होती. तिकिट खरेदी केल्यानंतर तीन तासांनंतर 199 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी खरेदी केलेल्या तिकिटावर प्रवासी प्रवास करताना आढळल्यास, त्याला दंड आकारला जातो. जर तुम्ही 3 तासामध्ये प्रवास सुरू केला नाही तर तुम्ही तिकीट रद्द करू शकत नाही किंवा इतर कोणत्याही ट्रेनने प्रवास करू शकत नाही.

मुदत का ठरवावी लागली?

आरक्षित नसलेल्या तिकिटांवर प्रवास करण्याची फसवणूक थांबवण्यासाठी रेल्वेने प्रवास सुरू करण्याची मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी वेळेचे बंधन नसल्यामुळे तिकिटांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत होता. दिल्ली आणि त्याचा आजूबाजूच्या परिसरात एक संपूर्ण टोळी यासंदर्भातील गैरव्यवहार करत होती. या टोळीचे सदस्य प्रवाशांकडून तिकीट काढून प्रवास संपताच कमी किमतीत इतर प्रवाशांना ते तिकीट विकायचे. त्यामुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होत होते.