Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Resume Writing Cost: रेझ्युमे बनवून घेण्यास किती खर्च येतो? पैसे देऊन रेझ्युमे तयार करण्याचे फायदे काय?

Resume Writing Cost

जॉब सर्च सुरू करताना पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप-टू-डेट रेझ्युमे जवळ असावा. कॉपी पेस्ट रेझ्युमेमुळे ड्रीम जॉब मिळण्यात अडथळा येऊ शकतो. तुमचा अनुभव, कौशल्ये, शिक्षण विचारात घेऊन तो तयार केलेला असावा. फ्रेशर्ससोबत अनुभव असणाऱ्यांनाही चांगल्या रेझ्युमेची गरज पडते. तुम्ही पैसे देऊन चांगला रेझ्युमे तयार करून घेऊ शकता. त्याचे अनेक फायदे आहेत.

Resume Writing Cost: शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधताना पहिली गरज पडते ती रेझ्युमे किंवा सीव्हीची. रेझ्युमे आणि सीव्हमध्ये फरक काय असा प्रश्न अनेकांना पडतो? एखाद्या ठराविक जॉबला अप्लाय करताना त्यासंबंधीत कौशल्ये आणि शिक्षण याची थोडक्यात माहिती रेझ्युमेमध्ये असते. (Difference between cv and resume) तर सीव्ही म्हणजेच करिक्युलम व्हिटा यामध्ये तुमचे शिक्षण, अनुभव, कौशल्ये आणि इतर माहिती सविस्तर लिहलेली असते. भारतामध्ये सीव्ही आणि रेझ्युमे अनेकजण एकच समजतात.

या लेखात पाहूया रेझ्युमे पैसे देऊन तयार करण्याचे फायदे काय? यासाठी किती खर्च येतो. फ्रेशर्स किंवा अनुभवी कोणाला जास्त चांगल्या रेझ्युमेची गरज असते.

कॉपी पेस्ट रेझ्युमे करू नका?

अनेकजण मित्राच्या रेझ्युमेवर स्वत:ची माहिती कॉपी पेस्ट करून अर्ध्या तासात रेझ्युमे तयार करतात. अशा वेळी अनेक जण तर त्यावरील संपूर्ण माहिती बदलण्याचेही कष्ट घेत नाहीत. पत्ता किंवा संपर्क क्रमांक मित्राचाच राहतो. (How much it will cost to make resume) यातून तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी किंवा करिअरच्या बाबतीत गंभीर नाहीत असा संदेश जातो. तसेच मुलाखत घेणाऱ्यापुढे तुमचे हसू होण्याची शक्यता असते.

तुमच्याकडील कौशल्ये आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात ते जुळून येत असतील तरच तुम्हाला एचआरकडून कॉल येण्याची शक्यता असते. मात्र, बऱ्याच वेळा तुमच्याकडे तो अनुभव आणि कौशल्ये असूनही तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होत नाही. (benefits of writing resume for professionals) तुमच्या रेझ्युमेत काहीही वेगळेपण नसल्यामुळे हे होऊ शकते. त्यामुळे सहसा मित्राच्या रेझ्युमेवर कॉपी पेस्ट करू नका. प्रत्येकाचा अनुभव, शिक्षण, कौशल्ये वेगवेगळी असतात. त्याला साजेसा रेझ्युमे तयार करण्यावर भर द्या.

चांगल्या रेझ्युमेची गरज कोणाला?

तुम्हाला असे वाटू शकते नुकताच कॉलेज पास आऊट झालेल्या मुलामुलींना चांगल्या रेझ्युमेची गरज असते. अनुभवी कर्मचाऱ्याला त्याची गरज नसते. अनुभव पाहून सहज नोकरी मिळते. मात्र, असे नाही. ज्यांना चार-पाच वर्षांचा अनुभव असतो अशा कर्मचाऱ्यांनाही एका उत्तम रेझ्युमेची गरज असते. एव्हाना अनुभव व्यवस्थित मांडून एचआरला प्रभावित करण्यासाठी त्यांना चांगल्या रेझ्युमेची गरज असते. 

रेझ्युमे तयार करुन घेण्यास किती खर्च येतो?

प्रोफेशनल रेझ्युमे तयार करून देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तसेच काही फिलान्सर्सही रेझ्युमे तयार करुन देतात. सहाजिकच त्यासाठी पैसे आकारतात. सर्वसामान्यपणे कमीत कमी 500 रुपयांमध्येही तुम्हाला रेझ्युमे तयार करून मिळू शकतो. मात्र, जर तुम्ही व्यावसायिक रेझ्युमे तयार करणाऱ्या कंपन्यांकडे गेल्यास जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

फ्रेशर्ससाठी रेझ्युमे तयार करण्यासाठी 1000 ते 1500 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

पाच वर्षांपर्यंत अनुभव असणाऱ्यांना 2000 ते 2500 रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो.

तर पाच ते दहा वर्ष अनुभव असणाऱ्यांसाठी 3000 हजारांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

तर दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणाऱ्यांना सात-आठ हजारांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. 

सोबतच कव्हर नोट, लिंक्डइन प्रोफाइल अपडेट, इन्फोग्राफिक सीव्ही यासाठी अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकतात.

head-image-3-2.jpg

रेझ्युमे तयार करण्यासाठी किती पैसे आकारण्यात येतात याचे एक उदाहरण. 

रेझ्युमे रायटिंग कंपनी कशा काम करतात?

प्रोफेशनल रेझ्युमे तयार करून देणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही अशा कंपन्यांशी रेझ्युमे तयार करण्यासाठी संपर्क साधता तेव्हा तुमच्याकडून शिक्षण, अनुभव, तुम्ही कोणत्या क्षेत्रात नोकरी शोधत आहात, तुमचे करिअर गोल्स यासह इतर माहिती घेतली जाते. त्यानुसार तुमचा वैयक्तिकृत (पर्सनलाइज्झ) रेझ्युमे तयार करून दिला जातो. तुमच्या जमेच्या बाजू रेझ्युमेत हायलाइट केल्या जातात. (how to create attractive resume) तर कमकुवत बाजू स्मार्ट पद्धतीने लिहल्या जातात. त्यामुळे एकंदर तुमचा रेझ्युमे चांगला वाटतो.

असे रेझ्युमे कंपन्यांकडून शॉर्टलिस्ट होण्याची शक्यता वाढते. (Resume writing price) जर तुम्ही स्वत: घरच्या घरी किंवा मित्राच्या रेझ्युमेवरुन तुमचा रेझ्युमे तयार करत असाल तर तुमच्यात स्पष्टता नसते. तुमचा रेझ्युमे विस्कळीत दिसतो. त्यात काहीही वेगळेपण दिसत नाही. ग्रामरच्या चुका, कलर कॉम्बिनेशन, महत्त्वाची माहिती, अनुभव योग्य रितीने मांडला नसल्याने तुमचा रेझ्युमे उठून दिसत नाही. मग तुमच्याकडे कितीही कौशल्ये अनुभव का असेना तुम्हाला एचआरचा कॉल येणार नाही. 

प्रोफेशनल रेझ्युमे तयार करुन देणाऱ्या कंपन्या तुम्हाला नंतरच्या सहा महिन्यांपर्यंत रेझ्युमेत काही बदलही करून देऊ शकतात. तसेच जॉब सर्च करताना मार्गदर्शनही केले जाते. फ्रेशर्सला असे मार्गदर्शन खूप गरजेचे असते.

रेझ्युमे तयार करताना काय ध्यानात घ्यावे 

रेझ्युमेत खोटी माहिती लिहू नका. कारण मुलाखतीवेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता.

रेझ्युमे सहज सोपा असावा. थोडक्यात पण स्पष्टपणे माहिती असावी.

अनुभव, कौशल्ये, तुमच्या करिअरचे ध्येय हायलाइट असावे.

तुमच्या बद्दलच्या सकारात्मक बाबी हायलाइट करा. तर नकारात्मक बाबी पॉझिटिव्ह दृष्टीकोनातून लिहा. 

प्रत्येक कंपनीला रेझ्युमे सेंड करता जॉब रोल नुसार बदल करा.