असं म्हटलं जातं की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण ती सत्यात उतरवण्याची आणि तो क्षण संस्मरणीय करण्याची जबाबदारी आपलीच असते. त्याचा रितसर सोहळा या भूतलावरच साजरा करावा लागतो (A Knot tied in heaven; Untied on Earth). जेणेकरून तो त्या जोडप्यांबरोबरच इतरांसाठीही संस्मरणीय (Memorable) ठरू शकेल. खरं तर आपली परंपरा आणि संस्कृती पाहिली तर ‘लग्न’ (Marriage) हा सोहळा त्या जोडप्यांपुरता मर्यादित राहत नाही. त्यात अनेक कुटुंब सहभागी (Marriage is family gathering) होत असतात. त्यामुळे हा सोहळा प्रत्येकाला दिमाखात साजरा व्हावा, असे वाटत असते. अर्थात यासाठी भरपूर पैसे खर्च केले जातात.
सध्या भारतीय वेडिंग इंडस्ट्री 1 लाख कोटींच्या पार गेली आणि ती प्रत्येक वर्षी 25 ते 30 टक्क्यांनी वाढत आहे. सध्याचा भारतातील लग्नाचा ट्रेण्ड पाहता लग्नाचा खर्च 20 लाख ते 5 कोटी (Average Wedding cost in India) या दरम्यान आहे. भारतात एक व्यक्ती अंदाजे त्याच्या एकूण उत्पन्नापैकी 1 पंचमांश रक्कम लग्नावर खर्च करते. लग्नासाठी फॅशन डिझायनरपासून, लग्न वेळेत पार व्हावे, पाहुण्यांची गैरसोय होऊ नये, फुलांची सजावट करणाऱ्यांपासून जेवणावळीपर्यंत सर्व गोष्टी नियोजनबद्ध व्हाव्यात यासाठी लाखो रुपये खर्च करून इव्हेन्ट प्लॅनर्सची मदत घेतली जाते आणि लग्नाचा दिवस मेमोरेबल करण्याचा प्रयत्न केला जातो.
आज आपण अशाच काही घटकांची माहिती घेणार आहोत. ज्यासाठी पैसे खर्च करावे लागतात.
Table of contents [Show]
लग्नाचे ठिकाण (Marriage Venue)
लग्नाचे ठिकाण हे सध्या खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण लग्नाला येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये. त्यांना सहज येता येईल. अशी ठिकाणे लग्नासाठी निवडली जात आहेत. तसेच हा सोहळा एकदाच होत असल्यामुळे तो संस्मरणीय करण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा ट्रेण्ड आहे. यासाठी लग्नाच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के खर्च हा ठिकाणावर होतो.
लग्नाचे मुहूर्त ज्या महिन्यात असतात; तेव्हा मनासारखा हॉल शोधणं आणि तो बुक करणं हे एक दिव्य मानलं जातं. या दिवसांमध्ये हॉलची किंमत भरमसाठ वाढलेली असते. शहरांमधील एका चांगल्या हॉटेलमधील बॉलरूमची एका दिवसाची किंमत 1 लाखाच्या आसपास असते. तुम्ही जर स्पेशल वेडिंग डेस्टिनेशन किंवा रिसॉर्टचा विचार करणार असाल तर यासाठी तुम्हाला काही लाख रुपये फक्त जागेसाठी खर्च करावे लागतात.
सजावट (Decor)
जीवनात एकदाच होणारा लग्नसोहळा हा सुखद आठवणींचा ठेवा म्हणून लक्षात राहावा, असे वाटत असेल याच्या सजावटीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. लग्नाचे ठिकाण तुम्ही ठरवलेल्या थीमनुसार फुलांना, विविध शिल्पांनी, शाही थाटमाट असो किंवा पारंपरिक रीतीरिवाज असो, ते हुबेहुब साकारलं जातं. यासाठी किमान 30 हजारांपासून 5 लाख रुपये खर्च केले जातात.
जेवण (Food)
लग्न सोहळ्यात ‘लग्नातलं जेवण’ हा खूपच महत्त्वाचा आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण कोणत्या लग्नात काय खाल्लं आणि ते चांगलं होतं की वाईट, हे वर्षानुवर्षे लोकांच्या लक्षात राहतं आणि त्यावर सातत्याने चर्चा केली जाते. त्यामुळे नातेवाईकांना आवडेल असंच जेवण ठेवण्यावर भर दिला जातो. त्यामुळे लग्नातल्या जेवणावर मनसोक्त खर्च केला जातो. प्रत्येक प्लेटची किंमत किमान 500 रुपयांपासून ते 2 ते 2.5 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
लग्नाचे कपडे (Wedding Dress)
लग्नात प्रत्येक विधीसाठी लागणारे कपडे हा एक वेगळा खर्च आहे. धार्मिक विधीपासून प्रत्यक्ष लग्नसोहळा आणि त्यानंतरच्या आदारतिथ्याच्या सोहळ्यासाठी वेगवेगळे कपडे घेतले जातात. यातील प्रत्यक्ष लग्नाचे आणि स्वागत समारंभाचे कपडे खूपच महाग असतात. मुलींची लग्नाची साडी किंवा लेहंगा हा किमान 25 हजार तर मुलाची डिझायनर शेरवानी 15 हजारापर्यंत जाते.
लग्न सोहळ्यातील विधी आणि समारंभ (Ceremonies)
भारतात प्रत्येक राज्यानुसार आणि लोकल चालीरितीनुसार लग्नामध्ये वेगवेगळे विधी आणि समारंभ असतात. काही जणांकडे लग्नाची विधी हे 3 दिवस चालतात तर काही जण एका दिवस ते पूर्ण करतात. पण या विधींना भारतीय लग्न सोहळ्यात खूप महत्त्व आहे. त्यामुळे ती विधिवत पूर्ण केले जातात. त्यामुळे यासाठी पैसेही त्याचनुसार खर्च केले जातात. याचा खर्च प्रत्येकाच्या परंपरेनुसार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत येऊ शकतो.
या बेसिक खर्चाव्यतिरिक्त लग्नात इतर असे अनेक खर्च आहेत. ज्याची यादी अजूनही खूप मोठी होऊ शकते. जसे की, वरातीची बॅण्ड, मिरवणुकीसाठी वापरली जाणारी गाडी किंवा घोडा, व्हिडिओ-फोटोग्राफी, लग्नाच्या पत्रिका, नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू, आहेर, मानपान अशा बऱ्याच गोष्टी असतात. ज्या सामाजिक प्रथा किंवा नाती टिकवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यावरही बऱ्यापैकी पैसे खर्च होतात.