How much has actress Vidya Balan's net worth decreased in the year 2022?: डर्टी पिक्चर, कहानी, तुम्हारी सुलू, पा आणि असे अनेक आठवणीत राहणारे सिनेमे विद्या बालनने प्रेक्षकांना दिले आहेत. बॉलिवुडची शेरनी विद्या तिच्या जबरदस्त अभिनयासाठी, वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. विद्याने 2005साली परिणिता सिनेमातून बॉलिवुडमध्ये एंट्री घेतली, त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज विद्या बालन 44 वर्षांची होत आहे, तरी ती सिनेमा, वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिने बॉलिवुड सृष्टीतील सर्व स्टिरिओटाईप्स तोडले आहेत, म्हणूनच ती अनेकांसाठी प्रेरणा आहे.
विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी मुंबई येथे झाला. तिच्या मॉडलिंग आणि अॅक्टींगची सुरुवात कॉलेजमध्ये असल्यापासून झाली. बॉलिवुडमध्ये येण्यापूर्वी तिचा हम पांच ही टिव्ही मालिका मोठ्या प्रमाणात गाजली होती. विद्या बालनने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, विद्या बालनचा चित्रपट म्हणजे प्रक्षकांना काहितरी वेगळे पाहायला मिळणार असे एक पर्सेप्शनच तिच्याविषयी तयार झाले आहे, ज्यात ती प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही.
विद्या बालन तिच्या सिनेमातील अभिनयाव्यतिरीक्त जाहिराती, एंडॉर्समेंट मधून पैसे कमावते. तसेच तिने काही व्यवसाय आणि रिअल इस्टेट प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक केली आहे. तर यंदाच्या वर्षात विद्या बालनची नेमकी कमाई किती झाली, तिचे 2022 वर्षातले नेटवर्थ काय होते हे जाणून घेऊयात.
2022 मध्ये विद्या बालनचे नेटवर्थ घटले (Vidya Balan Net Worth Declines In 2022)
अहवालानुसार, विद्या बालन ही भारतातील 100 सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. विद्या तिच्या प्रत्येक सिनेमासाठी किंवा सिरीजसाठी 6 ते 7 कोटींपर्यंत मानधन घेते. तर काही सिनेमांमध्ये ती प्रॉफिट शेअरही घेते. काही सिनेमे ती स्वत: प्रोड्युस करते यामुळे चित्रपटातून येणारी मिळकत वाढते. जाहिराती आणि एंडॉर्समेंटसाठी 1 कोटींपासून पुढे मानधन घेते.
उत्पन्नाव्यतिरिक्त, विद्याकडे मुंबईत अंदाजे 8 कोटींचे आलिशान घर आहे. देशभरात तिच्या अनेक मालमत्ता आहेत. तसेच 2022 मध्ये विद्याला तिच्या पतीने म्हमजे सिद्धर्थ रॉय कपूरकडून 14 कोटींचे घर भेट म्हणून मिळाले. याशिवाय, तिच्या मर्सिडीज-बेंझ आणि इतर महागड्या एसयुव्हीज गाड्या आहेत. मोटंरिगच्या 2022 अहवालानुसार, तिच्याकडे एकूण 35 कोटींच्या गाड्या आहेत.
सध्या, विद्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रॅमवर बरेच फनी व्हिडीओज पोस्ट करत असते, ज्याची खूप चर्चा होते. सध्या तिने इन्स्टाग्रॅवरुन स्पॉन्सर व्हिडीओ, जाहिराती आणि एंडॉर्समेंट करायला सुरुवात केली आहे. विद्या बालनने 2022 वर्षात एकूण 148 कोटींची कमाई केली. ही कमाई 2021 वर्षाच्या तुलनेत ७ कोटींनी कमी झाली आहे. करोनानंतर तिच्या नेटवर्थमध्ये घट झाली आहे. मात्र या काळात तिने साडी व्यावसायिकांना विविध प्रकारे मदत केली आहे. विद्याचे साड्यांवर खूप प्रेम आहे, हे जगजाहिर आहे. याशिवाय तिने विविध शासकीय उपक्रमांसाठी, सामाजिक जनजागृतीसाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही.