Highest Paid Actor in 2022: बॉलिवुड असो साऊथ इंडस्ट्री यामधील सेलेब्रिटींची चर्चा नेहमीच होताना दिसते. त्यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यात प्रेक्षक नेहमी तयार असतात. या कलाकरांच्या कोणत्या चित्रपटासाठी, किती मानधन घेतात हे माहिती करून घेण्यासाठी सर्वंजण उत्सुक असतात. चला, तर मग जाणून घेऊयात, 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते कोण आहेत?
Table of contents [Show]
रजनीकांत (Rajinikanth)
चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांचे नाव नेहमी अव्वल असते. देशभरात यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला सिनेमागृहाबाहेर रांगा लागलेल्या असतात. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दिग्गज अभिनेत्याने ‘अन्नाथे’ चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतले होते. इतकंच नाही तर त्यांनी आगामी अॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मानधन आकारले आहे.

कमल हसन (Kamal Hasan)
अभिनेता कमल हसन यांचा बॉलिवुड प्रमाणेच साऊथ इंडस्ट्रीमध्येदेखील मोठया प्रमाणात चाहते आहेत. हा अभिनेतादेखील प्रत्येक चित्रपटासाठी मोठी रक्कम आकारत असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चक्क कमल हसन यांनी आगामी ‘इंडियन 2’ चित्रपटासाठी 150 कोटी रुपये घेतले असल्याचे सांगितले जाते.

प्रभास (Prabhas)
बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रभास हा देखील 2022 मधील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी प्रभासने 120 कोटी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट रावणाच्या भूमिकेवरून वादग्रस्तदेखील ठरला होता.

अल्लू अर्जुन (Allu Arjun)
अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने संपूर्ण देशात धमाका केला होता. यातील गाण्यांनी तर सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता. मात्र अल्लु अर्जुन याने ‘पुष्पा पार्ट 2’साठी 120 कोटी रुपये घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

रामचरण (Ramcharan)
अभिनेता रामचरण याचा RRR हा चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला होता. यातील गाणेदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. आता या अभिनेत्याने आपल्या आगामी चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतले आहे.
