Panipuri Business Income: पाणीपुरी म्हटलं की लहान, तरुण, वृद्ध प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. पाणीपुरी हा सर्वांच्या आवडता पदार्थ आहे आणि भारतभर प्रसिद्ध सुद्धा आहे. मार्केट, मॉल, गार्डन, मंदिर (Market, Mall, Garden, Temple) या सर्व ठिकाणी आपल्याला पाणीपुरीचे स्टॉल दिसून येतात. पाणीपुरीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते पाणीपुरी, गोलगप्पा, गुपचुप. इतके पाणीपुरी स्टॉल असल्यानंतर यांची कमाई किती होत असेल? प्रत्येकाची कमाई जवळपास सारखी होत असेल का? हा व्यवसाय करतांना खर्च किती येत असेल याबाबत माहित करून घेऊया.
Table of contents [Show]
- पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण खर्च किती लागु शकतो? (What is the total cost of starting a panipuri business?)
- परवाना आणि नोंदणी आवश्यक आहे का? (licensing and registration required?)
- पाणीपुरीच्या व्यवसायात नफा (Profit in panipuri business)
- उत्पन्नासाठी महत्वाचा गोष्टी (Important things for income)
- पाणीपुरीच्या व्यवसायात तोटा (Loss in Panipuri business)
पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण खर्च किती लागु शकतो? (What is the total cost of starting a panipuri business?)
पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. तुम्हाला जर पाणीपुरीचे फक्त 2000 पिसेस करायचे असेल तर 20 किलो रवा लागु शकतो. तेल, रवा, वीज या सर्व गोष्टी एकत्र केल्या तर किमान खर्च फक्त 2000 रुपये आहे. कमीत कमी खर्चातही आपण हा व्यवसाय अगदी आरामात सुरू करू शकतो. मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरू केला तर त्याची किंमत सुमारे 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत येऊ शकते. कारण मशीन 70 ते 75 हजार रुपयांना येते. त्यासोबतच रवा, तेल, वीज इत्यादी कच्च्या मालाची किंमत सुमारे 90,000 आहे.
परवाना आणि नोंदणी आवश्यक आहे का? (licensing and registration required?)
पाणीपुरीच्या व्यवसायासाठी कोणत्याही विशेष परवान्याची आणि नोंदणीची आवश्यकता नाही. पण पाणीपुरीचा व्यवसाय खाद्य आणि पेय श्रेणीत येतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल, तर तुमच्या व्यवसायाची नोंदणी (Business registration), अन्न सुरक्षा यासाठी तुमच्याकडे FSSAI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न नऊ लाखांपेक्षा जास्त असल्यास, तुम्हाला जीएसटी नोंदणी देखील करावी लागेल. जर तुम्हाला कार्टवर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला परवाना घ्यावा लागेल. कारण परवान्याशिवाय तुम्ही कुठेही पाणीपुरी विकू शकत नाही.
पाणीपुरीच्या व्यवसायात नफा (Profit in panipuri business)
पाणीपुरी व्यवसाय सिजनेबल नाही, तो बाराही महीने बाराही काळ चालणारा आहे. बाजारात त्याची मागणी नेहमीच जास्त असते. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. सुमारे 1 तासात आपण 500 ते 750 रुपये अगदी आरामात कमवू शकतो. यानुसार, जर तुम्ही हा व्यवसाय संपूर्ण दिवस किंवा सुमारे 8 तास केला तर तुमचे उत्पन्न 1 दिवसासाठी 4000 ते 5500 रुपये होऊ शकते.
उत्पन्नासाठी महत्वाचा गोष्टी (Important things for income)
वर सांगितलेले इन्कम फक्त अंदाज आहे. तुम्हाला मिळणारा नफा हा तुम्ही व्यवसाय शहरात की गावात, मार्केट प्लेस (Market place) आहे की साधी, पाणीपुरीची टेस्ट या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. पण बघितले तर पाणीपुरीचा व्यवसाय हा असा व्यवसाय (Business)आहे, ज्यात नफा होणे निश्चितच आहे. पण काही वेळा आपल्याशी स्पर्धा करणारे सुद्धा असतात. त्यामुळे इन्कम मध्ये चढ उतार होऊ शकतो.
पाणीपुरीच्या व्यवसायात तोटा (Loss in Panipuri business)
विचार केला असतं या व्यवसायात तुमचे नुकसान होण्याची शक्यता नाही. कारण हा असा व्यवसाय आहे, जो सर्वांना आवडतो. कारण पाणीपुरी हा सर्वात आवडीनर खाल्ला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे जोखीम कमी आहे.