Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पॅन कार्डची वॅलिडिटी किती दिवस असते?

Pan Card Validity

बॅंकेत खाते सुरू करण्यापासून ते ITR भरण्यापर्यंत पॅनकार्ड (Pan Card) हे खूपच महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. पण मग या पॅनकार्डची मुदत कधी संपू शकते का? ते किती दिवस वैध असतं? असे प्रश्न तुम्हाला पडतात का?

आर्थिक व्यवहारासाठी पॅनकार्ड अत्यावश्यक दस्ताऐवज मानले गेले. त्यामुळे याचा काटेकोरपणे आणि प्रभावीपणे उपयोग केला जातो. बॅंकेत एखादे खाते सुरू करण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापर्यंत पॅनकार्ड (Pan Card) सरकारी कागदपत्र आणि केवायसी (Know Your Customer-KYC) म्हणून काम करतं. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा सोनं खरेदी करायचे असेल किंवा एखाद्या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पॅनकार्डची मागणी केली जाते. आधार कार्ड अस्तित्वात येऊनही पॅनकार्डचे महत्त्व कायम राहिले आहे. म्हणूनच आधारला पॅन कॉर्ड लिंक करणं बंधनकारक करण्यात आले. यामुळे कार्डधारकाची आर्थिक व्यवहारांची नोंद (Financial Transaction History) तपासता येणे शक्य झाले. पण पॅनकार्डची मुदत कधी संपू शकते का? पॅनकार्ड किती दिवस वैध कागदपत्र म्हणून काम करू शकते? असे प्रश्न स्वाभाविकपणे येऊ शकतात. आपणही पॅनकार्डच्या व्हॅलिडिटीवर लक्ष दिले नसेल तर त्याची मुदत जाणून घेऊ या. पॅनकार्ड कोण जारी करते आणि कसे तयार होते, हे समजून घेऊ.

पॅनकार्ड कोणाकडून मिळतं? Who issued PAN Card?

पॅन कार्ड एनएसडीएल (National Securities Depository Limited) जारी करतं. पॅनकार्डच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात असल्याने त्याला लीगल डॉक्युमेंट म्हटले जाते. करचुकवेगिरी रोखण्यासाठी पॅनकार्डचा वापर होतो. तरीही त्याची वैधता किती दिवसपर्यंत राहाते, याची माहिती असणे गरजेचे आहे.

पॅनकार्डची व्हॅलिडिटी लाईफटाईम! PAN Card Validity Lifetime!

पॅनकार्डची व्हॅलिडीटी ही आयुष्यभर राहते. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याचे पॅनकार्ड रद्द होते किंवा मृत्युप्रमाणपत्राच्या आधारे महत्त्वाच्या ठिकाणी केवायसी अपडेट करून संबंधित व्यक्तीचे पॅनकार्ड रद्द करता येऊ शकते. पॅनकार्डची एक्सपायरी ही कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होते. पॅनकार्डमधील दहा अंकी आकडे हे अल्फान्यूमेरिक (Alphanumeric) असतात. पॅनकार्डमध्ये संबंधित व्यक्तीची माहिती असते. कायदेशीररित्या एक व्यक्ती एकच पॅनकार्ड बाळगू शकतो. एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असल्यास दंड आकारला जातो.

एकापेक्षा अधिक पॅनकार्ड बेकायदा! More than one PAN card illegal!

Income Tax विभागाच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील आणि तो त्याचा वापर करत असेल तर ही कृती बेकायदा मानली जाते. त्याच्याविरुद्ध कारवाई देखील होऊ शकते. इन्कम टॅक्स कायदा 1961च्या 272 बी नुसार एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असल्यास दहा हजाराचा दंड आकारला जाऊ शकतो. आपल्याकडेही एकापेक्षा अधिक पॅनकार्ड असेल तर एक कार्ड जमा करू शकतो. पॅनकार्डला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीप्रकारे सरेंडर करता येते.

पॅनकार्ड कसे मिळवायचे? How to get pancard?

पॅनकार्ड घरबसल्या देखील ऑनलाईन मिळवता येऊ शकते. सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावून ‘इन्स्टंट पॅन थ्रू आधार’वर क्लिक करा. त्यानंतर गेट न्यू पॅनची निवड करा. त्यानंतर आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांक दिल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर त्याचा ओटीपी येईल. ओटीपी व्हॅलिडेशननंतर ई-पॅन जारी केले जाते. अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष कार्ड (Physical Card) देखील मागवू शकता.