Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund SIP: चांगला परतावा मिळत नसल्यास SIP बंद करावी का?

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP मधील गुंतवणूक ही रोलर कोस्टर सारखी वर खाली होत असते. बाजारातील विविध चढउताराचा परिणाम परताव्याच्या दरावर होतात. वर्ष-सहा महिन्यांच्या कालावधीत SIP गुंतवणुकीतील परतावा निगेटिव्ह झाला तर त्याने पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. कोणतीही एसआयपी बंद किंवा स्वीच करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते पाहा.

Mutual Fund SIP: म्युच्युअल फंड एसआयपी मधील गुंतवणूक ही रोलर कोस्टर सारखी वर खाली होत असते. बाजारातील विविध चढउताराचा सामना केल्यानंतरच दीर्घ काळात होणारा फायदा किंवा तोटा कळू शकतो. वर्ष-सहा महिन्यांच्या कालावधीत SIP गुंतवणुकीतील परतावा निगेटिव्ह झाला तर त्याने पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. लगेच एसआयपी बंद करण्याचा निर्णयही चुकीचा ठरू शकतो.

मागील काही वर्षात गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात अनेक चढउतार पाहायला मिळाले. काही म्युच्युअल फंडांनी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुदत ठेवी (FD) पेक्षाही कमी परतावा दिला तर काही योजनांतून चांगला परतावा मिळाला. जर तुम्ही गुंतवणूक केलेली एसआयपी चांगला परतावा देत नसेल किंवा मायनसमध्ये गेली असेल तर काय कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते पाहूया. 

मागील एक वर्षापासून SIP तून चांगला परतावा न मिळाल्यास काय करावे?

मागील एक वर्षात इक्विटी मार्केट खाली आल्याने अनेक योजनांमधून मिळणारा परतावा कमी झाला आहे. मात्र, अशा परिस्थितीचा फायदाही घेता येतो. बड्या कंपन्यांचे शेअर्समध्ये परवडणाऱ्या दरात SIP मधून गुंतवणूक करता येते. त्यामुळे दीर्घ काळात सरासरी पैशांचे मूल्य वाढण्यास मदत होते. बाजार खाली आला असताना नवी एसआयपी सुरू करण्याची चांगली संधी मिळते.

जेव्हा आपण एसआयपीचा विचार करतो तेव्हा दीर्घकाळ गुंतवणूक अपेक्षित असते. त्यामुळे बाजारातील अनेक चढउतार पाहिल्यानंतर दीर्घकाळात जास्त परतावा मिळण्याची शक्यता वाढते. मागील एक वर्षात बाजाराची कामगिरी चांगली नसेल तर लगेच योजनेतून पैसे काढून घेण्याचा निर्णय योग्य ठरत नाही.

SIP खाली येण्याचे मूळ कारण शोधा

जर जागतिक, देशांतर्गत बाजारातील घडामोडींमुळे एका ठराविक मर्यादेच्या आत SIP चे मूल्य कमी झाले असेल तर तुम्ही योजनेत पैसे ठेवण्याचा विचार करू शकता. कारण, पुढे जाऊन बाजार सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एसआयपीचे मूल्य वाढेल.

मात्र, योजनेतून परतावा चांगला मिळत नसण्यामागे फंडासंबंधीत काही मूलभूत घटक असल्यास तुम्ही पैसे काढून घेण्याचा विचार करू शकता. जसे की, फंड व्यवस्थापनातील बदल, गैरव्यवहार, अनियमितता, जोखीम किती घ्यावी या नियमातील बदल, फंड मॅनेजमेंट आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापित करण्यातील बदल धोकादायक ठरू शकतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे अॅक्सिस म्युच्युअल फंड. फंड व्यवस्थापनावर गैरव्यवहाराचे आरोप झाले असून याची चौकशी सुरू आहे. सेबीने या प्रकरणात लक्ष घातले आहे.

तसेच जर तुमच्या गुंतवणूक ध्येयात बदल झाला असेल किंवा नजीकच्या काळात तुम्हाला पैशांची गरज लागणार असेल तरीही तुम्ही एसआयपी योजना बंद करू शकता किंवा जास्त जोखीम असलेल्या इक्विटी योजनांमधून कमी जोखीम असलेल्या डेट फंडामध्ये पैसे हलवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, अल्प काळात एखाद्या योजनेतून चांगला परतावा मिळत नसेल तर दीर्घ काळातही कमीच परतावा मिळेल, असे होत नाही. परतावा अनेक पटींनी वाढूही शकतो. 

( डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही. )