Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How can Withdraw Money from ATM by Mobile: एटीएम कार्ड शिवाय मोबाईलव्दारे काढा ATM मधून पैसे!

How can Withdraw Money from ATM by Mobile

Image Source : http://www.wsj.com/

Withdraw Cash From ATM Without A Debit: प्रत्येकाच्या आयुष्यात हा अनुभव आला आहे की, कुठे बाहेर पडलो आणि एखादी वस्तू आवडली आहे. मात्र ती खरेदी करण्यासाठी जवळ एटीएम (ATM) नाही, त्यामुळे ती वस्तू घेण्यास आपण टाळतो. यापुढे असे होणार नाही. कारण आम्ही तुम्हाला एटीएम कार्ड नसताना ही मोबाईलव्दारे एटीएममधून कसे पैसे काढायचे याबाबत सांगणार आहोत.

Withdraw Cash From ATM Without A Debit: आपण खरेदीसाठी बाहेर पडला आहात, मात्र एटीएम कार्ड घरीच विसरला आहात. मात्र आता काय करायचे, हा प्रश्न पडला असेल, तर अशा परिस्थितीत कोणतीही काळजी करू नका. कारण या टेक्निकल युगात सर्व शक्य आहे. त्यामुळे आता तुम्ही एटीएम कार्ड शिवाय मोबाईलव्दारे ATM मधून पैसे काढू शकता. यासंबंधी थोडक्यात सर्व माहिती जाणून घ्या.

कोणते माध्यम वापरावे (Which Platform Should be Used)

आजकालचा जमाना हा डिजिटल पेमेंटचा आहे. त्यात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये डिजिटल पेमेंटचे अ‍ॅप्स उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही या डिजिटल माध्यमांचा उपयोग करून एटीएम कार्ड विना ATM मशीनमधून पैसे काढू शकणार आहात. जसे की, तुम्ही GooglePay, PhonePe आणि Paytm सारख्या UPI पेमेंट सेवा देणाऱ्या अ‍ॅप्सच्या साहाय्याने एटीएममधून रोख पैसे काढू शकता. सध्या मोठया प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर होऊ लागला आहे.

मोबाईलव्दारे ATM मधून काढा पैसे (Withdraw Money from ATM through Mobile)

सर्वप्रथम तुम्ही ज्या ठिकाणी असाल, तेथील जवळच्या कोणत्याही ATM मशीनवर जावा आणि नंतर स्क्रीनवर असलेल्या Withdraw cash हा पर्याय निवडा. त्यानंतर  UPI या पर्यायाची निवड करा. यानंतर तुम्हाला समोर ATM स्क्रीनवर एक क्यूआर (QR) कोड दिसेल. मग, तुम्ही तुमच्या फोनवर UPI चे कोणतेही एक अॅप सुरु करा आणि ATM मशीनवर दाखवलेला QR कोड स्कॅन करा. यानंतर तुम्हाला पाहिजे असलेली रक्कम त्याठिकाणी टाकावी. मात्र लक्षात ठेवा की, याव्दारे तुम्ही फक्त 5,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता. UPI PIN टाकावे आणि Proceed बटण दाबावे.अशा प्रकारे तुम्हाला सहज व सोप्या पध्दतीने ATM मशीनमधून पैसे काढता येईल.