Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Certificate for Pensioners: पेन्शनधारक ऑनलाइन 'जीवन प्रमाणपत्र' कसे जमा करू शकतात? जाणून घ्या प्रोसेस

Life Certificate for Pensioners

Image Source : https://www.freepik.com/

निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शनचा लाभ मिळत नाही.

मात्र, वृद्ध नागरिकांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत अथवा वित्तीय संस्थेत जाणे शक्य होत नाही. अशा नागरिकांसाठी ऑनलाइन माध्यमातून जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पेन्शनधारक घरबसल्यास डिजिटल जवीन प्रमाणपत्र सादर करून पेन्शनचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे हे प्रमाणपत्र जमा करण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. ऑनलाइन डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची नक्की प्रोसेस काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी  या आवश्यक गोष्टी

डिजिटल जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. तुम्ही जर स्वतः घरून जीवन प्रमाणपत्र जमा करणार असाल तर बायोमेट्रिक डिव्हाइस असणे आवश्यक आहे.

याशिवाय, जीवन प्रमाणपत्र काढण्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) नंबर, पेन्शन अकाउंट नंबर, बँक खात्याची माहिती, पेन्शन मंजूर करणाऱ्या व वितरण करणाऱ्या प्राधिकरणाची माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही जीवन प्रमाण वेबसाइट व अ‍ॅपवरून हे प्रमाणपत्र काढू शकता.

ऑनलाइन डिजिटल जीवन प्रमाणपत्र कसे जमा करू शकता?

  • ऑनलाइन डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी जीवन प्रमाण अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही https://jeevanpramaan.gov.in या वेबसाइटवरून देखील प्रमाणपत्र जमा करू शकता.
  • अ‍ॅपवर गेल्यानंतर आधार क्रमांक व मोबाइल नंबरच्या मदतीने लॉग इन करा. तसेच, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
    डिव्हाइस रिजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकाचे नाव, पीपीओ नंबर, पेन्शन प्रकार, पेन्शन मंजूर करणारे व वितरण करणारे प्राधिकरण, ईमेल आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
  • आता तुम्हाला Scan Finger पर्यायावर क्लिक करून बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल.
  • हे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर जीवन प्रमाणपत्र उपलब्ध होईल. याशिवाय, एसएमएसच्या माध्यमातून जीवन प्रमाण सर्टिफिकेट आयडी देखील मिळेल.
  • हे प्रमाणपत्र पेन्शनधारक व पेन्शन वितरण करणाऱ्या एजन्सीसाठी कधीही व कुठेही उपलब्ध असते. एकदा प्रमाणपत्र जनरेट झाल्यानंतर पेन्शन देणारी एजन्सी देखील ऑनलाइन पद्धतीने याची पडताळणी करू शकते.
  • तसेच, पेन्शनधारक आधार क्रमांक किंवा जीवन प्रमाण आयडीच्या मदतीने हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.