POS machine: टॅक्स वसूली आता पीओएस मशीनद्वारे( POS machine) सुद्धा केली जात आहे. यामुळे महसूल वसुलीत होणारी फसवणूक थांबणार असून, जमा झालेला महसूल (revenue) थेट सरकारी तिजोरीत त्वरित जमा होणार आहे. इतकेच नव्हे तर स्लिपच्या आधारे थेट ऑनलाइन महसूल (Online revenue)भरल्याने करदात्यांना दिलासा सुद्धा मिळतो. अनेकदा खोटेपणा आणि भ्रष्टाचाराच्याही तक्रारी आहेत, यावर बंदी आणण्यासाठी पीओएस मशीनद्वारे ( POS machine) कर वसूली करणे योग्य ठरत आहे. टॅक्स वसुलीचे डिजिटलायझेशन करावे अशी मागणी अनेकांनी केली होती, त्यावर अमलबजावणी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पीओएस मशीनद्वारे महसूल गोळा करण्याची पद्धत अवलंबली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ही सिस्टिम सुरू झालेली आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
जिल्हा पंचायत कर वसूली (Tax Collection)
जिल्हा पंचायत ग्रामीण पिठाची गिरणी, घर, मेडिकल स्टोअर, हार्डवेअर, सायकल, मोटारसायकल दुरुस्ती, कापड, सोनार, मशीनचे भाग यावर कर वसूल केला जातो. काही वेळ या टॅक्स बद्दल खोटेपणा, फसवणूक यासारखे प्रकार घडतात. टॅक्स भरल्यानंतर सुद्धा रक्कम जमा केली जात नाही. अशा वेळी पुन्हा खर्च करावा लागतो. अशा फसवणुकीपासून सुटका करण्यासाठी पीओएस मशीनचा वापर टॅक्स गोळा करण्यासाठी होत आहे.
महसूल कसा जमा होतो? (How is revenue collected?)
नवीन प्रणाली अंतर्गत, ब्लॉकनिहाय कर (Tax) निरीक्षक नेमले जातात आणि सर्वांना पीओएस मशीन ( POS machine) देण्यात येते. पीओएस मशीनद्वारे टॅक्स स्लिप (Tax Slip) कापली जाते आणि त्यानुसार महसूल वसूल केला जातो. पीओएस मशीनवरूनही ऑनलाइन पेमेंट (Online payment) करता येते. यामुळे जिथे पूर्वी पंधरवड्यातून एकदा महसूल जमा होत असे, तिथे आता दररोज वसूल होणारी रक्कम सरकारी तिजोरीत जमा होते.
आता करदात्यालाही दिलासा मिळणार आहे (Now the taxpayer will also get relief)
नवीन प्रणालीमुळे जिल्हा पंचायतीचा महसूल (Revenue of Zilla Panchayat) पारदर्शकपणे जमा होणार असून करदात्यालाही दिलासा मिळतांना दिसत आहे. आता त्याला कोणीही फसवू शकणार नाही. त्याचा टॅक्स थेट जिल्हा पंचायतीच्या खात्यात जमा होणार असून तो कोणताही ताण न घेता आपला व्यवसाय करू शकणार आहे. सर्व कर निरीक्षकांना पीओएस मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.