Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Housing demand In India: पुढील वर्षात घर खरेदी जोमात, कोरोना गृहनिर्माण क्षेत्राची वाढ रोखणार का?

Housing demand In India

चालू वर्षात घरांना मोठी मागणी होती. मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले तसेच एकंदर घर घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून घर खरेदीकडे पाहिले जात आहे. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. त्याचा परिणाम जगभरातील भांडवल बाजारात दिसून आला.

चालू वर्षात घरांना मोठी मागणी होती. मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले तसेच एकंदर घर घेण्यासाठी ग्राहक उत्सुक होते. इतर क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा सुरक्षित पर्याय म्हणून घर खरेदीकडे पाहिले जात आहे. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. त्याचा परिणाम जगभरातील भांडवल बाजारात दिसून आला. २०२० वर्षात कोरोनाचा फैलाव झाला होता तेव्हा गृहनिर्माण क्षेत्राला मोठा फटका बसला होता. (Housing demand In India) मात्र, आता पुन्हा यामध्ये तेजी आहे. पुढील वर्षीही घर खरेदी तेजीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचे संकट मध्ये आले तर विकासाला खीळ बसू शकते.  

चालू वर्षात शहरी भागात मुख्यत टायर-1 आणि टायर-2 शहरांमध्ये घराच्या किमती ३ ते ५ टक्क्यांनी वाढल्या. अहमदाबाद, लखनऊ सारख्या शहरांमध्ये घर खरेदी तेजीत होती. पुढील वर्षी निदान पहिल्या तिमाहीपर्यंत ही वाढ अशीच राहिल, असे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार कंपनी ANAROCK ने म्हटले आहे.

व्याजदरात वाढ

रशिया-युक्रेन युद्ध, ऊर्जा संकट यामुळे जगभरात मंदी येईल असे जाणकारांचे मत आहे. त्यामध्ये जर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले तर अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात येऊ शकते. २०१९ नंतर भारतामध्ये कोरोना प्रसारानंतर अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले होते ते बऱ्याच अंशी भरून काढण्यात आले आहे. मात्र, मंदीची चाहूल लागल्यानंतर आरबीआयसह अनेक देशांतील शिखर बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे विविध प्रकारची कर्ज महाग झाली आहेत. अशा परिस्थिती घरांची मागणी कमी होऊ शकते. २०२२ वर्षात फक्त गृहप्रकल्पच नाही तर व्यावसायिक प्रकल्प, गोदाम, ऑफिस, रिटेल क्षेत्रात बांधकाम आणि विक्री वाढली होती.

व्याजदर वाढीनंतरही गृहनिर्माण क्षेत्र तेजीत

“दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, गृहकर्जावरील व्याजदरात दोन टक्क्यांनी वाढ होऊनही विक्रीचा वेग कायम आहे. कार्यालये, रिटेल आणि गोदामांची जागा भाडेतत्त्वावर देणारे व्यवसाय पूर्वपदावर आले होते. कार्यालये आणि शैक्षणिक संस्था सुरू झाल्या तसेच को-वर्किंग आणि को-लिव्हिंग स्पेसमधील व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला. मालमत्तांची किंमत आणि भाडेही यावर्षात वाढले. मालमत्ता विकासक कंपन्याकडून तंत्रज्ञानाचा वापरही वाढला आहे, असे Housing.com, Proptiger.com आणि Makaan.com चे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल म्हणाले. 

अर्थव्यवस्थेचा आणखी विस्तार होणार

येत्या काळात अर्थव्यवस्थेचा आणखी विस्तार होईल. कोरोनापूर्व काळात ज्या प्रकारे कामकाज चालत होते ती स्थिती पुढील वर्षात येईल. इतरही अनेक घटक आहेत ज्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल. विकासक ग्राहकांना गृहखरेदीवर विविध प्रकारची सूट देत आहेत. राज्य सरकारही नवी धोरणे आणण्याच्या नियोजनात आहे, ज्यामुळे या क्षेत्राचा विकास होईल, असे जाणकारांचे मत आहे.