MCLR Rates : एचडीएफसी बँकेच्या कर्जधारकांना गेल्या महिन्यात MCLR दर (Marginal cost based lending rate) बाबत सुखद धक्का मिळाला होता. बँकेने एप्रिल महिन्यात गृहकर्जाच्या व्याजदरासाठी एमसीएलआर 85 बेस पॉईंट्सने कमी केला होता. ज्यामुळे कर्जदारांना महागड्या कर्ज दरापासुन दिलासा मिळाला होता. परंतु आता बँकेने पुन्हा एकदा MCLR दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता हे दर 8 मे 2023 म्हणजेच आजपासून लागू करण्यात आले आहे.
Table of contents [Show]
काय असेल MCLR दर?
एचडीएफसी बँकेने MCLR दर 15 बेसिस पॉईंटने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. HDFC बँकेने एका रात्रीचा MCLR आता 7.80 टक्क्यांवरुन 7.95 टक्क्याच्या वर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एका महिन्यासाठीचा MCLR दर 7.95 टक्क्यांवरुन 8.10 टक्के झाला आहे. तीन महिन्यांसाठी MCLR दर 8.40 टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR दर 8.80 टक्क्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. आणि एका वर्षा साठीच्या कालावधीसाठी 8.95 टक्क्यांवरुन 9.05 टक्के झाला आहे. दोन वर्षाचा MCLR 9.10 टक्के झाला आहे. आणि तीन वर्षांसाठी 9.20 टक्के MCLR दर असेल.
EMI रक्कमेत होईल वाढ
HDFC बँकेने MCLR दर वाढवल्याने जुन्या कर्जधारकांवर परिणाम होईल, कारण त्यांची EMI रक्कम वाढेल. तर, नवीन ग्राहकांना कर्जासाठी जास्त व्याज भरावे लागेल.
HDFC बँक बेस रेट आणि BPLR
HDFC बँकेचा बेस रेट 9.15 टक्के आहे. तर, बेंचमार्क PLR 17.65 टक्के आहे. हे दोन्ही दर 7 मार्च 2023 पासुन लागू झाले आहे.
MCLR दर म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट हा मूलभूत किमान दर आहे. या दराचा आधार घेऊनच बँका कर्जदारांना कर्ज देतात. विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर निश्चित करण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे MCLR ची स्थापना करण्यात आली होती.