भारतीय रेल्वेनं सात मार्गांवर हाय स्पीड ट्रेन (High Speed Train) सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. आणि त्यांच्या सर्वेक्षणाबरोबरच सर्वंकष प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) तयार करण्याचं कामही सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैश्णव (Ashwini Vaishnav) यांनी अलीकडे संसदेत याविषयीची माहिती दिली.
हे सात हायस्पीड कॉरिडॉर्स (High Speed Railway Corridor) पुढील प्रकारे आहेत - दिल्ली ते वाराणसी (Delhi to Varanasi), दिल्ली ते अहमदाबाद (Delhi to Ahmedabad), मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur), मुंबई ते हैदराबाद (Mumbai to Hyderabad), चेन्नई ते बंगळुरू (Chennai to Bengluru), म्हैसूर ते दिल्ली (Mysore to New Delhi), चंदिगड ते अमृतसर (Chandigarh to Amritsar) आणि वाराणसी ते हावरा (Varanasi to Hawra) रेल्वेमंत्र्यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली. सध्या देशात मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प (MAHSR) हा एकमेव अशाप्रकारचा प्रकल्प आहे. आणि त्याच्या उभारणीसाठी जपान सरकारने भारतीय रेल्वेला मदत केली आहे.
हायस्पीड प्रकल्पांबरोबरच भारतीय रेल्वेनं आणखी दोन सेमी स्पीड प्रकल्पांसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. थीरुअनंतपुरम ते कासरगोड हा प्रकल्प स्टँडर्ड गेज मार्ग असेल तर पुणे ते नाशिक या ब्रॉडगेज मार्गासाठीही रेल्वेनं प्रत्यक्ष उभारणी आधीचा अहवाल मागवला आहे.
या दोन सेमी स्पीड रेल्वे मार्गांसाठी केरळ रेल्वे विकास कॉऑपरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र रेल्वे सुविधा विकास कोऑपरेशन लिमिटेड या दोन कंपन्या स्थापन करण्यात येतील. आणि या कंपन्या त्या त्या राज्यातल्या राज्यसरकारंच्या आधीन असतील.