Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero HF Deluxe Bike : उत्तम माइलेज देणारी हीरो एचएफ डीलक्स बाईक मिळणार केवळ 60 हजार रुपयांमध्ये

Hero HF Deluxe Bike

Image Source : www.heromotocorp.com

Hero HF Deluxe Bike : भारतात बाईकला प्रचंड मागणी आहे. नागरिक ऑफिस, मार्केटला जाण्यासाठी आणि विद्यार्थी कॉलेजला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाईकचा वापर करतात. त्यामुळे Hero HF Deluxe नावाची बाईक ही एक उत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे, जी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. Hero Motorcorp ने या बाईकसाठी 83 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

Hero HF Deluxe Bike In 60 Thousand Rupees :  भारतात बाईकची मोठी बाजारपेठ आहे, जिथे लोक ऑफिस,मार्केट किंवा कॉलेजला जाण्यासाठी बाइकचा वापर करतात. परंतु,महागड्या पेट्रोलच्या किमतींमुळे नागरिकांना अधिकाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्स पाहिजे असते. Hero HF Deluxe बाईक उत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे, जी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. Hero Motorcorp ने या बाईकसाठी 83 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

8 रंगांचे पर्याय उपलब्ध

HF डिलक्सची किंमत ६०,७६० रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही किंमत ड्रम ब्रेक आणि किक स्टार्ट व्हेरियंटची आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटसाठी (HF DELUXE I3S DRUM SELF CAST) तुम्हाला 67,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल. तुम्हाला ही बाईक एकूण 8 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकचे वजन 110 किलोग्रॅम आहे आणि तिची इंधन टाकी क्षमता 9.1 लीटर आहे. भारतात, Hero HF Deluxe ही बाईक बजाज CT100, TVS Sport आणि Honda CD 110 Dream सारख्या इतर बाईक सोबत स्पर्धा करते.

इंजिन आणि वैशिष्ट्ये

Hero HF Deluxe मध्ये 97.2cc इंजिन आहे. हे इंजिन 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. बाइक समोर आणि मागील ड्रम ब्रेकसह येते आणि कंबाईन ब्रेकिंग सिस्टम (CBS) देखील उपलब्ध आहे. HF डिलक्सचे एकूण चार प्रकार उपलब्ध आहेत. स्पोक व्हील्ससह किक-स्टार्ट, अलॉय व्हील्ससह किक-स्टार्ट, अलॉय व्हील्ससह सेल्फ-स्टार्ट आणि i3S तंत्रज्ञानासह सेल्फ-स्टार्ट असे हे चार प्रकार उपलब्ध आहेत.

उत्कृष्ट फिचर्स

फिचर्सच्या बाबतीतही ही बाईक एकदम बेस्ट आहे. यात स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि इंधन गेजसह अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हॅलोजन हेडलाइट आहे. बाईकच्या इंजिनला इंधन-इंजेक्शन सिस्टीम आणि एक्ससेन्स टेक्नॉलॉजी आहे. आयडल स्टार्ट-स्टॉप सिस्टीम त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याला 'i3S' सिस्टम म्हणतात. हे फिचर बाइकचे मायलेज सुधारते. यात साइड स्टँड इंजिन कट ऑफ आणि बाईक पडल्यावर इंजिन बंद होण्याची वैशिष्ट्ये देखील आहेत.